आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्कराने आज मोठे यश मिळवत जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला ठार केले आहे. सर्जिकल स्ट्राइकला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लष्कराने उरीसारख्या दुसर्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. दहशतवाद्यांनी पाच वर्षापूर्वी उरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये अनेक सैनिक शहीद झाले होते. प्रत्युत्तरात भारतीय सैनिकांनी देखील मोठी कारवाई केली होती.
सीमा रेषेवर गेल्या 9 दिवसांपासून ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असे 19 पायदळ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जनरल वीरेंद्र म्हणाले की, 18 सप्टेंबर रोजी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले, सैन्याने गस्त घालत असताना सीमा रेषेवर घुसखोरीची शंका आली होती.
गोळीबाराच्या धुराचा फायदा घेत सीमेत घुसले दहशतवादी
वीरेंद्र वत्स म्हणाले की, जेव्हा चकमक सुरू झाली तेव्हा दोन दहशतवादी सीमा रेषेत शिरले, तर चार दहशतवादी त्याच बाजूला राहिले. भारतीय हद्दीत घुसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अतिरिक्त बळाचा वापर करण्यात आला. दरम्यान, या कारवाईत 25 सप्टेंबर रोजी चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आणि दुसरा पकडला गेला. अटकेत असलेल्या दहशतवाद्याने आपले नाव अली बाबर पत्र असल्याचे सांगितले. हा 18 वर्षीय दहशतवादी मूळचा पाकिस्तानमधील पंजाबचा आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असून त्याने मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
पाकिस्तानच्या मदतीशिवाय घुसखोरी अशक्य
ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या इतक्या मोठ्या गटाची हालचाल पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. एलओसीच्या त्या बाजूला लाँच पॅडवर सतत हालचाल सुरू असते. गेल्या सात दिवसांत आम्ही 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला असे ते वीरेंद्र वत्स म्हणाले. अटकेत असलेल्या दहशतवाद्यांकडून एके मालिकेची 7 शस्त्रे, 9 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर आणि 80 हून अधिक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्याकडून पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.