आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pakistan Terror Plot Exposed; Border Security Force (BSF) Patrol Detects Tunnel On India Pakistan Border In Jammu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानची कुटील चाल उघड:पाकिस्तानलगत सरहद्दीवर सापडला 557 फूट बोगदा, एक टोक पाकिस्तानात, तर दुसरे भारतात

सांबा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लास्टिकच्या गोण्यांवर पाकिस्तानची खूण

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा कट उधळून लावत एक बाेगदा शोधून काढला आहे. हा १७० मीटर (५५७ फूट) लांबीचा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सांबा सेक्टरमध्ये सापडला.

जम्मू बीएसएफ रेंजचे आयजी एन. एस जामवाल यांनी सांगितले की, गस्ती पथकाने सांबा जिल्ह्यात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान बसंतार क्षेत्रामध्ये सीमेजवळ २५ फूट खोल आणि ३ ते ४ फूट व्यास असलेला बोगदा सापडला. तो कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून बोगद्याचे तोंड वाळूच्या गोण्यांनी झाकले होते. या गोण्यांवर शकरगढ, कराचीमधील सिमेंट कारखान्याचे नाव आहे. सीमेजवळ पाकिस्तानी सैन्य व इतर संस्थांच्या सहमतीशिवाय एवढा मोठा बोगदा तयार करणे शक्य नसल्याचेही जामवाल म्हणाले.

प्लास्टिकच्या गोण्यांवर पाकिस्तानची खूण

गोण्यांवरील तारखांवरून या नुकत्याच तयार केेलेल्या असाव्यात, असे निदर्शनास आले आहे. बीएसएफने या भागात पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे. आणखी काही ठिकाणी बोगदे असण्याची शक्यता वर्तवली आहे.