आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताविरोधात कट रचणे पाकिस्तान सोडत नाही. दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब तसेच राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) जाहीर केलेल्या आकडेवारीचा हवाला देताना वृत्तसंस्थेने म्हटले आहे की अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी राजस्थान आणि गुजरातमध्ये घुसखोरी नाही
गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत BSF ने राजस्थान आणि गुजरात बॉर्डरवरुन घुसखोरीच्या कोणत्याही घटनेची नोंद केली नाही. यावर्षी येथे घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. तर, BSF च्या काश्मीर फ्रंटियरने यावर्षी बॉर्डरवर घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घुसखोरीच्या चार घटना समोर आल्या होत्या.
BSF पूर्णपणे सतर्क
अतिरेक्यांना भारतात पाठवण्यासाठी पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांची शोध घेत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. आपले सैनिक पूर्णपणे सतर्क आहेत आणि 24 तास सीमेवर पाळत ठेवत आहेत. ते म्हणाले की, BSF आपल्या जवानांची पोजिशन इंटेलिजेंस इनपुटच्या हिशोबाने सातत्याने अपडेट करत असतात.
सर्वात जास्त घुसखोरी जम्मू आणि पंजाब बॉर्डरवरुन
BSF अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 11 घुसखोरीच्या घटना घडल्या. घुसखोरी जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या बॉर्डरने करण्यात आली होती. यावर्षी जम्मू आणि पंजाब बॉर्डरवरुन सर्वात जास्त 4-4 घुसखोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या.
जुलैमध्ये गुजरात-राजस्थान सीमेवर केला होता प्रयत्न
गुजरात-राजस्थान बॉर्डरवर रण ऑफ कच्छला लागून अससेल्या सीमेवर जुलैमध्ये 12-13 लोक घुसखोरीच्या प्रयत्नात होते. घुसखोरांना गस्त घालणाऱ्या जवानांनी अनेक इशारे दिले होते, पण ते पुढे जात राहिले. यानंतर सैनिकांनी गोळीबार केला, ज्यामध्ये एक घुसखोर ठार झाला, इतर सर्वजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
नोव्हेंबरमध्ये 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने दीडशे मीटर लांबीच्या बोगद्याचा पर्दाफाश केला होता. BSF ने एका घुसखोरालाही ठार केले होते. जम्मूमधील BSF चे IG एनएस जामवाल यांनी सांगितले होते की आंतरराष्ट्रीय सीमेवरील या बोगद्याच्या स्थापनेमुळे हे स्पष्ट होते की पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना मदत करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.