आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक अतिरेक्यांची नवी रणनीती:ड्रोनद्वारे पंजाबमध्ये ड्रग्ज-शस्त्र पुरवठा, रस्ते मार्गाने काश्मीरमध्ये पाठवत आहेत अतिरेकी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरमध्ये सध्या पंजाब व हिमाचल प्रदेशतील रस्ते मार्गाने ड्रग्ज, शस्त्र व दारुगोळा पाठवण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांना नुकतेच असे पुरावे मिळालेत. यावरून पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपली रणनीती बदलल्याचे स्पष्ट होते. गुप्तहेर संघटनांनी गत महिन्यातच या मार्गाविषयी एक अलर्ट जारी केला होता. ड्रोनच्या माध्यमातून भारतीय हद्दीत येणारी अशी खेप पंजाब मार्गे काश्मीर खोऱ्यात नेली जात असल्याचा संशय आहे.

नोव्हेंबर महिन्यात ड्रग्जसह शिक्षक अटकेत

गत महिन्यात पंजाब पोलिसांनी जम्मू काश्मीरच्या पूंछमधील एका शिक्षकाला 5 किलो अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. अन्य एका घटनेतही जम्मू काश्मीर पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले होते. हे मादक पदार्थही जम्मू काश्मीरला पोहोचवण्यात आले होते. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती. राज्य पोलिसांनी पंजाबहून 7 किलो अंमली पदार्थ आणणाऱ्या एका दाम्पत्यालाही अटक केले होते.

पंजाब व जम्मू काश्मीरला जोडणाऱ्या हाय वेवरुन पुरवठा

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंजाब व जम्मू काश्मीरला जोडणाऱ्या महामार्गावरही पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात येणाऱ्या व जम्मू काश्मीरच्या विविध भागांत पुरवण्यात येणाऱ्या अशा खेपांची हालचाल पहावयास मिळाली आहे. पंजाब पोलिसांनी पठाणकोटमध्ये लश्कर ए तोयबाच्या एका अतिरेक्याला अटक केली होती. हा अतिरेकी काश्मीरमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नांत होता.

बातम्या आणखी आहेत...