आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Violates Ceasefire In Jammu And Kashmir Rajouri Sector,violates Ceasefire More Than 2700 Times This Year

पाकची कुरापत:जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, यावर्षी 2700 हून अधिकवेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या युद्धविराम उल्लंघनात यावर्षी आतापर्यंत 21 नागरिकांचा मृत्यू, तर 94 लोक जखमी झाले आहेत.(फाइल फोटो) - Divya Marathi
पाकिस्तानच्या युद्धविराम उल्लंघनात यावर्षी आतापर्यंत 21 नागरिकांचा मृत्यू, तर 94 लोक जखमी झाले आहेत.(फाइल फोटो)
  • पाकिस्तानने यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक 411 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शनिवारी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. यानंतर भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानने यावर्षी 2700 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकने गेल्या वर्षी 3168 आणि 2018 मध्ये 1629 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या दरम्यान 21 नागरिकांचा मृत्यू झाला तर 94 लोक जखमी झाले.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जवान रॉबिन कुमार गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांची प्राणज्योत मालवली. ते हिमाचल प्रदेशातील हमीरपुर येथील रहिवासी होते.

महिनाशस्त्रसंधी उल्लंघन संख्या
जानेवारी367
फेब्रुवारी366
मार्च411
एप्रिल387
मे382
जून114

पुंछ सेक्टरमध्येही जवान झाला होता शहीद

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात एलओसीजवळ पुंछ सेक्टरमध्ये भारताचा एक जवान शहीद झाला होता. तर दोन जखमी झाले होते. पाकिस्तानने 12 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरवर गोळीबार केला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झाला होता.

बातम्या आणखी आहेत...