आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Vs India Kashmir; Dubai Build Logistics Parks, IT Towers, Medical College In Kashmir

पाकिस्तानला धक्का:जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करणार दुबई; आयटी टॉवर, मेडिकल कॉलेज उभारणार

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कलम 370 रद्द केल्याच्या जवळपास दोन वर्षांनी दुबईने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर प्रशासन आणि दुबई यांच्यात पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत अनेक करार करण्यात आले आहेत. कराराअंतर्गत दुबई आयटी टॉवर, औद्योगिक उद्याने, लॉजिस्टिक टॉवर्स तसेच काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये बांधतील. मात्र, दुबई काश्मीरमध्ये किती गुंतवणूक करणार हे अद्याप उघड झालेले नाही.

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला मुस्लिम देशांचा पाठिंबा दिसत नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक आवाहन केल्यानंतरही ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ने काश्मीर प्रश्नावर वक्तव्य केले नाही. या मुद्द्यावर त्यांना यूएई, बांगलादेशसह बहुतेक मुस्लिम देशांचे समर्थन मिळताना दिसत नाही. आता दुबईने भारताच्या बाजूने निर्णय घेऊन पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, काश्मीरच्या विकासासाठी जग आपल्यासोबत येत आहे. हा करार दाखवतो की भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.

पाकिस्तानसाठी हा मुत्सद्दी पराभव: बासित
पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी दुबई आणि जम्मू -काश्मीर प्रशासन यांच्यातील या कराराला पाकिस्तानचा राजनैतिक पराभव म्हटले आहे. बासित यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधत म्हटले, 'हा करार भारतासाठी एक मोठे यश आहे. आधीच ओआयसीने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलेला नाही.

वेगळा पडला पाकिस्तान!
काश्मीरच्या मुद्द्यावर अधिकाधिक देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे, पण तुर्की आणि चीन वगळता कोणत्याही देशाने आतापर्यंत काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात निवेदन दिलेले नाही. पाकिस्तानने लाखो प्रयत्न केल्यानंतरही सौदी अरेबिया आणि इराणने या विषयावर मौन पाळले आहे.

IMF ने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज नाकारले
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. आयएमएफने हे देखील स्पष्ट केले आहे की 1 अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता पाकिस्तानला दिला जाणार नाही. खरे तर, वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ आणि पाकिस्तानचे अर्थमंत्री यांच्यात सुरू असलेली चर्चा अयशस्वी झाली आहे.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेचे अर्थमंत्री शौकत तारेक यांची टीम आणि IMF यांच्यात 11 दिवस चाललेली चर्चा आतापर्यंत अनिर्णीत होती. ही बैठक 4 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि 15 ऑक्टोबरपर्यंत चालली.

बातम्या आणखी आहेत...