आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PoKत घुसून 40 अतिरेक्यांचा खात्मा:फायरिंगमुळे संयम सुटला असता तर फेल झाली असती सर्जिकल स्ट्राइक, जवान झाडीत तसेच लपले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

29 सप्टेंबर 2016 चा दिवस होता. भारताचे DGMO अर्थात लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह एक पत्रकार परिषद घेतात. त्यांनी घोषणा केली - 'भारताने अतिरेक्यांच्या सीमापार लॉन्च पॅडवर सर्जिकल स्ट्राइक केली आहे.' म्हणजे हे की, भारतीय लष्कराने प्रथमच नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे अड्डे नष्ट केले. हा केवळ उरी हल्ल्याचा बदला नव्हता, तर पाकला अतिरेकी हल्ले केले तर त्याच्या घरात शिरून मारण्याचा निर्वाणीचा इशाराही होता.

लष्करी रणनीतीच्या अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या हल्ल्यांना प्रीएम्टिव्ह स्ट्राइक म्हटले जाते. आतापर्यंत अमेरिका व इस्त्रायल सारख्या देशांनी अशी आक्रमक स्ट्रॅटेजी अंमलात आणली होती. भारताने त्याचा अंमल केल्याने अवघे जग थक्क झाले होते.

सरकारने 2018 मध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या दुसऱ्या वर्धापण दिनी ही व्हिडिओ जारी केला होता.

चला तर मग आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, सर्जिकल स्ट्राइकची ट्रेनिग कशी व कुठे झाली, तसेच ती अंमलात कशी आणली गेली याचा वृत्तांत...

सर्वप्रथम जाणून घ्या कसा झाला उरी हल्ला?

तारीख - 18 सप्टेंबर 2016. वेळ -सकाळी साडे 5. चार अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या वेषात नियंत्रण रेषा ओलांडून काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्यांच्या निशाण्यावर उरी स्थित भारतीय लष्कराचे ब्रिगेड मुख्यालय होते. पहाट होण्यापूर्वीच त्यांनी या ठिकाणी हल्ला केला. 3 मिनिटांतच अतिरेक्यांनी 15 हून अधिक ग्रेनेड डागले. त्यात भारताचे 19 जवान शहीद झाले. अनेक जखमी झाले. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत चारही अतिरेकी यमसदनी पोहोचले.

इंडियन पॅरा ट्रूपर स्पेशल फोर्सेस म्हणजे PARA SF पोहोचते. या कमांडोंची ओळख गडद भुरकट रंगाच्या टोपीतून होते. त्याला मरून बॅरेही म्हणतात. PARA SF पोहोचेपर्यंत हल्ला संपला होता. मागील 20 वर्षांतील लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. सर्वत्र बदला घेण्याची भावना होती.

संरक्षण विश्लेषक नितीन गोखले म्हणतात की, आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी हा हल्ला पीओकेतील जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी केल्याचा छडा लावला होता. पाकिस्तानी लष्कराचा या अतिरेक्यांना खुला पाठींबा होता.

1965 मध्ये भारत-पाक युद्दानंतर जून 1966 मध्ये PARA SF ची स्थापना करण्यात आली होती.
1965 मध्ये भारत-पाक युद्दानंतर जून 1966 मध्ये PARA SF ची स्थापना करण्यात आली होती.

शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश

दिल्लीचे वातावरण तापले होते. उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, आर्मी व संरक्षण मंत्री सर्वांचे एक मत होते. शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर द्यावेच लागेल. म्हणजे उरी हल्ल्यानंतर गप्प राहता येत नव्हते. त्यानंतर सीमापार अतिरेक्यांचे अड्डे म्हणजे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच सर्वच पर्यांवर सल्लामसलत झाली.

आपल्याकडे हवाई हल्ल्यासाठी लॉन्ग रेंज आर्टिलरी फायरचा पर्याय होता. पण हेतू होता पाकला कठोर संदेश पोहोचवण्याचा. निर्णय झाला होता. एक सर्जिकल स्ट्राइक करण्याचा. त्यात भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मिरात घुसून अतिरेक्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणार होते.

या मोहिमेसाठी जम्मू काश्मीर स्थित लष्कराच्या PARA SF च्या 2 यूनिट्सची निवड करण्यात आली. शत्रूला PARA SF च्या जवानांहून कुणीही चांगले ओळखत नव्हते.

एक टॉप सीक्रेट मोहीम आखण्यात आली. सर्जिकल स्ट्राइक सारख्या धोकादायक मोहिमेसाठी 2 टीम्स तयार करण्यात आल्या. स्ट्राइक टीम-1 चे लीडर होते मेजर अवनीश (बदललेले नाव) व स्ट्राइक टीम-2 चे लीडर होते मेजर विनीत. हा हल्ला करणाऱ्या दोन्ही लीडर्सचे नाव केव्हाच सार्वजनिक करण्यात आले नाही.

तारीख : 23 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 9 वाजले होते

स्ट्राइक टीम-2 चे लीटर मेजर विनीतला तत्काळ ट्रेनिंग एरियामध्ये रिपोर्ट करण्याचा फोन येतो. त्यानंतर सर्जिकल स्ट्राइकसाठी गेम प्लॅन तयार करण्याची मोहीम सुरू होते. स्ट्राइक टीम -1 चे लीटर मेजर अवनीश म्हणतात की, आम्ही आमच्याकडे असणाऱ्या सर्वच पर्यायांवर विचार सुरू केला. ते सर्व दिल्लीलाही पाठवले.

तारीख : 23 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 10:30 वाजले होते

पंतप्रधानांपुढे 23 सप्टेंबर रोजी एक प्लॅन सादर करण्यात आला. पीओकेतील मल्टिपल टार्गेट्सवर हल्ला करण्याची योजना होती. आर्मी मुख्यालयाने अतिरेक्यांच्या 6 लॉन्च पॅड्सची निवड केली होती. हे सर्वच टार्गेट शत्रूच्या भागात होते. तसेच तो परिसरी अत्यंत दुर्गम होता. हे टार्गेट एकमेकांपासून खूप दूर होते प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी हल्ला करणे जवळपास अशक्य होते.

आज आम्ही यापैकी 2 टीमची कहाणी सांगत आहोत.

ऑपरेशनसाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. स्ट्राइक टीम 1 व स्ट्राइक टीम-2 ला उत्तर काश्मीरमधील 2 टार्गेटची जबाबदारी मिळाली. मेजर अवनीश व मेजर विनीत यांनी आपली स्पेशलाइज्ड रेकी टीम तयार केली. त्याचे मुख्य काम होते शत्रूच्या हालचालीवर करडी नजर ठेवणे व आवश्यक माहिती गोळा करणे. मेजर विनीत आपल्या टीमसोबत होम बेसमधून बाहेर पडले. या रेकीचे 3 मुख्य उद्देश होते.

एक - लाइन ऑफ कंट्रोलवर जाण्यासाठी सर्वाच चांगला मार्ग निवडणे.

दोन- टार्गेटवर 24 तास नजर ठेवणे.

तीन - सेफ एग्जिट प्लॅनवर काम करणे.

अतिरेक्यांच्या रेकीसाठी PARA SF च्या 2 टीम PoK पोहोचल्या

तारीख : 24 सप्टेंबर 2016

वेळ : सायंकाळचे 6 वाजले होते

LOC लगत खूप बिल्टअप एरिया व गाव होते. शत्रूचे खबरी सर्वत्र पसरले होते. त्यामुळे त्यांच्या हातावर तुरी देणे सर्वात मोठे चॅलेंज होते. अतिरेक्यांच्या घुसखोरीचा मार्ग घनदाट जंगलातून जातो. मेजर विनीतची टीम आपल्या मोहिमेवर निघते.

तारीख : 24 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 9:30 वाजले होते

दुसरीकडे, जवळपास 100 किमी दूर मेजर अवनीश आपल्या रेकी टीमसह होम बेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी पीर पंजालच्या घनदाट जंगलाचा मार्ग निवडला. येथून कुणीही जात नव्हते. त्याचे खास कारणही होते. जमिनीपासून काही इंच खाली अँटी पर्सनल माइंसचे जाळे अंथरण्यात आले होते. जे हलक्या स्पर्षानेही फुटण्याची भीती होती. म्हणजे चुकीचे एक पाऊल व या जवानांसोबतच मोहिमेला पूर्णविराम अशी स्थिती होती. विशेषतः माइंस अंथरण्याला खूप कालावधी झाल्यामुळे ते मूळ जागेवरून सरकण्याचीही भीती होते. त्यामुळे ती नेमकी कुठे सरकली याचा अंदाज काढणेही फार अवघड काम होते.

पण प्रशिक्षण व दक्षतेने काम झाले. मेजर अवनीश व त्यांच्या रेकी टीम-1 एलओसी ओलांडून पीओकेच्या लीपा व्हॅलीत प्रवेश केला. दुसरीकडे, मेजर विनीत व त्यांची रेकी टीम-2 पीओकेच्या निर्जन अरनकेर सेक्टरमध्ये पोहोचली होती. तिथे कोणताही रस्ता नव्हता. सर्वत्र केवळ घनदाट जंगल होते.

तारीख : 25 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 12:45 वाजले होते

दोन्ही टीम आता पीओकेत पोहोचल्या होत्या. येथे त्यांना स्वतःचे संरक्षण करायचे होते. मृत्यू डोक्यावर होता. पाकिस्तानी पोस्ट, 24 तास सतर्क पेट्रोलिंग व सर्विलांस ड्रोन प्रत्येक कृतीवर करडी नजर ठेवत होते. सकाळीच जवानांनी एक आवाज ऐकला.

मेजर अवनीश व त्यांची रेकी टीम-1 तिथेच थांबले. हे हायटेक मोशन सेंसरने सुसज्ज एक पाकिस्तानी ड्रोन होते. ते छोटीशी हरकतही पकडण्यात तरबेज होते. ड्रोन जाईपर्यंत टीम तिथेच उभी राहिली. त्यानंतर मेजर अवनीश आपल्या सहकाऱ्यांसह पुढे सरकले.

तारीख : 25 सप्टेबंर 2016

वेळ : सकाळचे 6:54 वाजले होते

रेकी टीमचा पहिले काम फत्ते झाले होते. टीमला अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडपर्यंत जाण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग मिळाला होता. मेजर अवनीश यांनी सांगितले की, सहसा आम्ही हा मार्ग 5 ते 6 तासांतच पूर्ण करतो. पण त्यादिवशी आम्हाला तब्बल 10 तास लागले.

अखेरीस दोन्ही रेकी टीम टार्गेट म्हणजे अतिरेक्यांच्या तळापर्यंत पोहोचल्या होत्या. दोन्ही टीमने आपली पोझीशन घेतली. काही जवान तर टार्गेटच्या 250 मीटर जवळ पोहोचले होते. त्यांचा गणवेष त्यांना शत्रूपासून लपवण्यात मदत करत होता. आता त्यांचे दुसरे लक्ष्य होते टार्गेटविषयी अधिकाधिक माहिती गोळा करण्याचे.

मिशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक होते. 24 तास निगराणी सुरू झाली. पण स्वतःला लपवून ठेवत शत्रूच्या भागात एवढा वेळ घालणे सोपी गोष्ट नव्हती.

तारीख : 25 सप्टेंबर 2016

समय : सकाळचे 7:30 वाजले होते

अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडचे व्हिडिओ तयार करण्यात आले. सर्व गोष्टींचा सारासार विचार करण्यात आला. टार्गेटचा एक ले आऊट मॅप तयार करण्यात आला. म्हणजे अतिरेकी कोणत्या ठिकाणी स्वतःचे जेवण तयार करतात, शस्त्र ठेवतात व पाणी कुठे ठेवतात या सर्व गोष्टींची खातरजमा करण्यात आली. प्रत्येक माहिती काढण्यात आली. म्हणजे अतिरेकी किती होते. त्यांच्याकडे शस्त्र कोणती होती. त्यांचा मूव्हमेंट पॅटर्न काय होता. जसे दुपारी ते बोट गेम्स खेळत होदते. तसेच पोस्टवर काहीवेळ घालवत होते.

तारीख : 25 सप्टेबंर 2016

वेळ : दुपारचे अडीच वाजले होते

लॉन्च पॅडवर काही नवे चेहरे दिसून आले. हा पूर्णतः प्रशिक्षित अतिरेक्यांचा समूह होता. ते भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज झाले होते. लष्कराला आपल्या खबऱ्यांकडून या लॉन्च पॅडवरील अतिरेक्यांचा आकडा वाढल्याची खबर मिळाली. मेजर विनीत यांचीही हीच इच्छा होती. या मोहिमेचे उद्दीष्टच मुळात अधिकाधिक अतिरेक्यांना ठार करण्याचे होते. सायंकाळच्या सुमारास लॉन्च पॅडवरील हालचाल मंदावली. रात्री 8 च्या सुमारास पूर्णतः शांतता पसरली होती.

दुसरीकडे, मेजर अवनीशच्या टार्गेटवरही रात्रीपर्यंत हालचाल थांबली होती. तेव्हा अचानक रात्री 8.15 च्या सुमारास अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. मेजर अवनीश अत्यंत शांत होते. त्यांचे जवान झाडीत लपून गोळी चालवण्याचा पॅटर्न समजून घेत होते. ही केवळ स्पेक्युलेटीव्ह फायरींग असल्याचे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. असे नेहमीच केले जाते. ज्या दिशेने हल्ला होण्याची भीती असते त्या दिशेने स्वतःच्या सुरक्षेसाठी असा गोळीबार केला जातो.

याचा अर्थ आताही अतिरेक्यांना रिकॉन टीमचा थांगपत्ता लागला नव्हता. येथे एक चूक संपूर्ण मोहिमेवर पाणी फेरणारी ठरली असती. त्यामुळे मेजर अवनीश व त्यांच्या पथकाने शांत राहणे पसंत केले. तसेच गोळीबार आपल्या दिशेने होणार नाही अशी आशा व्यक्त केली.

तारीख : 26 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 6:30 वाजले होते

सकाळपर्यंत गोळीबार बंद झाला. आता शत्रूच्या हद्दीतून निघण्याची वेळ आली होती. आता दोन्ही पथकांकडे सर्जिकल स्ट्राइकसाठी आवश्यक असणारी माहिती उपलब्ध होती. स्पेशल फोर्सचे कमांडिग अधिकारी सांगतात की, आता आमच्याकडे अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडची प्रत्येक माहिती होती. म्हणजे ते किती ताकदवान आहेत. एवढेच नाही तर अतिरेक्यांच्या एकेक कमांडरचे नावही आमच्याकडे होते.

दुसरीकडे, मेजर विनीतचे जवान 80 डिग्री उतारावर तैनात होते. येथून निघणे सोपे नव्हते. त्यामुळे काही दोऱ्या बांधून तिथेच सोडून देण्यात आल्या. यामागे परत येताना फायदा होईल, असा हेतू होता.

आता रेकी टीमचे तिसरे उद्दीष्ट एक्झिट प्लॅन म्हणजे परत जाण्यासाठी एक छोटा व सुरक्षित मार्ग शोधण्याचे होते. कारण, भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर या भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची भीती होती. त्यामुळे एक ठोस प्लॅन जवानांचे जीवन व मृत्यूतील अंतर ठरणार होता.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत दोन्ही टीम्स आपापल्या पोस्टवर पोहोचल्या. त्यांनी गोळा केलेल्या माहितीवर नजर टाकली. आता टार्गेटवर 24 तास नजर ठेवण्यात येत होती. अनमॅन्ड एरियल व्हेइकल स्पेशल आफोर्सच्या हेडक्वार्टरपर्यंत लाइव्ह फिड पोहोचवत होते.

फोन येतो मित्रांनो निघण्याची वेळ झाली आहे

तारीख : 27 सप्टेंबर 2016

वेळ : दुपारी 3 वा.

अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ आली होती. मेजर अवनीश व मेजर विनीत यांनी आपल्या सर्वात निष्णात सैनिकांची निवड केली होती. मेजर अवनीश सांगतात की, आम्ही लॉन्च पॅडवर ज्या स्ट्रॅटेजीसह हल्ला केला, त्यासाठी अत्यंत निवडक सैनिकांची निवड केली होती. मेजर विनीत यांनीही निवड करण्यात आलेल्या सैनिकांनी खोऱ्यात 15 ते 16 वर्षे काढल्याचे सांगितले. प्रत्येक स्पेशालिस्ट स्क्वाडला हल्ल्याची पोझिशन सांगण्यात आली. प्रत्येकाकडे अत्याधूनिक शस्त्रास्त्र होते. प्लॅन खूप सोपा होता. पूर्ण तयारीने हल्ला करायचा होता.

स्पेशल फोर्सच्या एका जवानाने सांगितले की, आम्ही रात्रीच्या वेळी डिनर करत होतो. मी माजे सीओ व उर्वरित सदस्य. तेव्हाच फोन आला. सीओने थम्सप केले. त्यानंतर एक वाक्य म्हटले, मित्रांनो निघण्याची वेळ झाली आहे. स्ट्राइक टीम-1 निघाली. आता त्यांना मिशन फत्ते करून परत यायचे होते.

तारीख : 28 सप्टेंबर 2016

वेळ : दुपारचे 4 वाजले होते

मेजर अवनीशच्या टीमला होम बेसमधून एअरलिफ्ट करण्यात आले.

तारीख : 28 सप्टेंबर 2016

वेळ : सायंकाळचे 4:45 वाजले होते

स्ट्राइक टीम-1 ला अनमार्क्ड लँडिंग झोनमध्ये उतरवण्यात आले.

तारीख : 28 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 8:15 वाजले होते

मिलिट्री ट्रक व सिव्हिलियन व्हेइकलद्वारे स्ट्राइक फोर्सला रणनीतीनुसार, निश्चित ठिकाणी पोहोचवण्यात आले. प्लॅननुसार स्ट्राइक टीम-2 पीर पंजालच्या जंगलाच्या दिशेने पुढे सरकली. आत जाण्यासाठी योग्य वेळ व चंद्र प्रकाशाची वाट पाहण्यात आली. टीम अशा मार्गाने आत गेली की ती आपल्या लोकांनाही समजले नाही.

स्ट्राइक टीमचे संख्या वाढली. त्यांचे शस्त्र अवजड आहेत. दारुगोळाही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे पकडे जाण्याची भीती जास्त होती. रेकी टीमची तयारी कामास आली. दोन्ही स्ट्राइक टीम एलओसीपर्यंत पोहोचल्या. कुणाच्याही नजरेस न येता अगदी सुरक्षित.

तारीख : 28 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 11:40 वाजले होते

मेजर अवनीशची टीम शत्रूच्या भागात म्हणजे पीओकेत पोहोचली होती. मेजर विनीतच्या टीमनेही एलओसी ओलांडली होती.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 12.10 वाजले होते

मेजर विनीतच्या रॉकेट लॉन्चर टीमला शत्रूच्या तळाला अधिकाधिक नुकसान पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. रॉकेट लॉन्चरने जबरदस्त बॅक ब्लास्ट होतो. यामुळे मागे 40 मीटरपर्यंत मोकळी जागा हवी असते. अन्यथा तो चालवणाराच होरपळण्याची भीती असते.

हा भाग आव्हानकारक होता. उतार जवळपास 80 डिग्रीचा होता. पण मेजर विनीतकडे यावर तोडगा होता. रॉकेट लॉन्चर टीमला हार्नेस घालण्यात आले. दोऱ्या बांधून उभ्या उतारावर हल्ल्यासाठी एक सेफ फायरिंग पोजिशन तयार करण्यात आली.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 2 वाजले होते

स्ट्राइक टीम-1 व स्ट्राइक टीम- 2 आता हल्ल्यासाठी तयार होती. पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणासह दोन्ही टीम्स अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडवर हल्ला करणार होत्या. आता केवळ प्रतीक्षा करायची होती.

त्यातच 300 किमी दक्षिणेत जम्मू रीजनच्या स्पेशल फोर्सेसच्या आणखी एका टीमने अतिरेक्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले. म्हणजे पाकला उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक सुरू झाली होती.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : रात्रीचे 2:20 वाजले होते

काही मिनिटांतच स्ट्राइक टीम-1 चे टार्गेट म्हणजे अतिरेक्यांनी खबरदारीस्तव आपल्या लॉन्च पॅडच्या चारीह दिशांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. स्ट्राइक टीम-1 च्या सबस्क्वाडच्या दिशेने फायरिंग सुरू होती. आर्मीने मिशन तत्काळ संपवण्याचे आदेश दिले होते. पण फायनल डिसिजन युद्ध मैदानातील लीडर्सवर सोडला.

मेजर अवनीश यांनी सबक्वाडवर जबरदस्तपणे गोळीबार केला जात होता. पण ते एक कॅल्क्युलेट रिस्क घेण्यास तयार होते. त्यांची टीम अजूनही शत्रूच्या नजरेस पडली नव्हती. त्यामुळे ते शांतपणे बसून राहिले. ते पहाट होण्याची वाट पाहत होते. यावेळी त्यांनी टीमला थोडे मागे जाण्याचे निर्देश दिले.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 5:15 वाजले होते

शत्रूचा गोळीबार बंद झाला होता. स्ट्राइक टीम-1 हल्ला करण्यासाठी तयार होती. जवानांनी आपापली पोझिशन घेतली.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 6 वाजले होते

मेजर अवनीश यांनी अॅक्शन म्हणताच जवानांनी लॉन्च पॅडवर हल्ला सुरू केला. शत्रूवर चारही बाजूंनी अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. यामुळे त्यांना स्वतःला सांभाळण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. काय सुरू आहे, हे त्यांच्या लक्षातही येत नव्हते. शत्रू इकडे तिकडे पसलले. त्यानंतर दुसरी टीम आत पोहोचली. स्पेशल फोर्सेसने शत्रूचे लॉन्च पॅड पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकले.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 6:20 वाजले होते

टार्गेट-2 पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. पण मिशन अजूनही संपले नव्हते. जवळची पाकिस्तानी पोस्ट अलर्ट झाली होती. त्यांनी स्ट्राइक टीमच्या दिशेने गोळीबार केला. हा एक्झिट प्लॅन सुरू झाल्याचा इशारा होता.

स्ट्राइक फोर्सला तेथून लवकरात लवकर निघून जायचे होते. गोळ्यांचा पाऊस व मोर्टारच्या स्फोटांच्या आवाजाचा योग्य वापर करत स्ट्राइक टीम तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली.

POK तील उद्धवस्त झालेल्या लॉन्च पॅडचे छायाचित्र.
POK तील उद्धवस्त झालेल्या लॉन्च पॅडचे छायाचित्र.

तारीख : 29 सप्टेबंर 2016

वेळ : सकाळचे 6:30 वाजले होते

स्ट्राइक टीम-1 आपल्या टार्गेटवर जोरदार हल्ला चढवत होती. मिशन संपण्याची वेळ होत होती. निघण्याचा वेळ झाला होता. पण त्यांच्या दिशेने पाकिस्तानी लष्कर जोरदार फायरिंग करत होते. जवानांच्या कानाजवळून गोळ्या जात होत्या. कधी डाव्या, कधी उजव्या बाजूला हातगोळे पडत होते. तेव्हा तेथून तत्काळ निघण्याचा आदेश आला.

सर्वच जवान शत्रूच्या गोळ्यांना चकवा देत तेथून वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडले. सकाळी 9 वाजेपर्यंत दोन्ही टीम हल्ल्याच्या ठिकाणाहून बाहेर पडल्या होत्या. पण आताही त्या शत्रूच्या भागात होत्या. अत्यंत सावधगिरीने त्यांनी एलओसीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. स्ट्राइक -2 ने आपल्या मायभूमीवर पाऊल ठेवले होते.

तारीख : 29 सप्टेबंर 2016

वेळ : सकाळचे 9:30 वाजले होते

स्ट्राइक टीम-1 एलओसी ओलांडून काश्मीर खोऱ्यात पोहोचली होती.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 9:45 वाजले होते

लष्करी मुख्यालयाला सर्वच टीम सुरक्षित परत आल्याचा संदेश देण्यात आला.

तारीख : 29 सप्टेंबर 2016

वेळ : सकाळचे 9:50 वाजले होते

पुढे जाताना एक जोरदार स्फोटो होतो. नंतर कळते की एका जवानाने चुकून माइनवर पाय ठेवला होता. स्फोटात त्याच्या पायाचा एक भाग उडाला होता. जवानाचा पाय वाचवण्यासाठी त्याला तत्काळ एअरलिफ्ट करणे गरजेचे होते. मेजर अवनीश यांनी हेलिकॉप्टर मागवले. स्ट्राइक टीम-2 इव्हॅक्युएशन पॉइंटवर पोहोचली होती. हेलिकॉप्टने जखमी जवानाला नेण्यात आले.

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, 6 टार्गेटवर एकूण 38 ते 40 अतिरेकी व पाक लष्कराच्या 2 सैनिकांना यमसदनी पाठवून PARA SF च्या कमांडोंनी उरी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर आर्मीच्या पत्रकार परिषदेत या सर्जिकल स्ट्राइकची विस्तृत माहिती देण्यात आली.

त्यावेळी नॉदर्न आर्मी कमांडर म्हणून या मोहिमेचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डा यांनी सांगितले होते की, याठिकाणी अतिरेक्यांच्या संख्येला महत्व नव्हते. महत्व केवळ ऑपरशननंतर जवान सुरक्षित परत येण्याला होते. या मोहिमेत 100 अतिरेक्यांना सफाया करताना एक जवान शहीद झाला असता तरी आमच्या मते ही मोहीम अपयशी ठरणार होती.

बातम्या आणखी आहेत...