आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसखोरीचा प्रयत्न:पाकिस्तानी ड्रोन पुन्हा अमृतसरमध्ये घुसले, सर्च ऑपरेशन दरम्यान दीड किलो हेरॉईन जप्त

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील अमृतसर येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानी तस्करांनी पुन्हा ड्रोन पाठवले. तत्काळ कारवाई करत सीमा सुरक्षा दलाने (BSF) ड्रोनने फेकलेली खेप जप्त केली. बीएसएफ जवानांनुसार, पाकिस्तानी तस्कर सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.

तस्कराला ठिकाण कळावे म्हणून मालासह एक टॉर्चही बांधण्यात आली होती.
तस्कराला ठिकाण कळावे म्हणून मालासह एक टॉर्चही बांधण्यात आली होती.

बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरच्या सीमावर्ती गावात रात्री दहाच्या सुमारास हे यश मिळाले आहे. बटालियन 22 चे जवान रात्री गस्तीवर होते. त्याचवेळी त्यांना ड्रोनची हालचाल लक्षात आली. सतर्क जवानांनी मोर्चेबांधणी केली, इतक्यात त्यांना काहीतरी फेकले असल्याची कल्पना आली. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

शेतातून मोठे पाकिट सापडले
दोन तासांच्या शोधात बीएसएफला डाओके गावच्या शेतात हेरॉईनची चार पाकिटे असलेली केशरी रंगाची पिशवी सापडली. ड्रोनमधून फेकण्यासाठी त्यात हुकही बसवण्यात आला होता. यासोबतच तस्करांकडून एक टॉर्चही पाठवण्यात आली होती.

जप्त केलेल्या मालाचे एकूण वजन 1.590 किलो इतके आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे 10 कोटी रुपये आहे.