आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर:भारतीय सीमेवर नजर ठेवणारे पाकिस्तानचे ड्रोन पाडले! जम्मूत 70 मीटरपर्यंत केली घुसखाेरी

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ केरन भागात भारतीय सीमेवर नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानच्या ड्राेनला लष्कराने पाडले. घटना शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. भारताच्या हद्दीत दहशतवाद्यांना घुसखाेरी करण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी संघटनांना सशस्त्र पाेहाेचवणे, दहशतवाद्यांना घुसखाेरी करण्यासाठी पाकिस्तान या भागात मार्ग शाेधण्याचेही प्रयत्न करत आहे. शनिवारी पाकिस्तानच्या सैन्याचे ड्राेन सीमेवर तैनात जवानांवर नजर ठेवण्यासाठी भारतीय हद्दीत घुसले तेव्हा सतर्क जवानांनी तत्काळ त्याला गाेळी मारून पाडले. अपघातग्रस्त ड्राेन चिनी कंपनीने तयार केलेले आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्याचे माॅडेल डीजेआय माविक-२ प्राे आहे. आधी हे ड्राेन पाकिस्तानच्या सीमेमध्ये उडत हाेते. परंतु, त्याने भारतीय हद्दीत प्रवेश करताच त्याला पाडण्यात आले. हे ड्राेन भारतीय हद्दीत ७० मीटरपर्यंत आले हाेते. चाैकीत तैनात जवानांनी गाेळी मारून त्याला पाडले. त्यानंतर लष्कराने त्यास ताब्यात घेतले.