आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा:नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एलओसीजवळ शनिवारी भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

17 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला, मात्र ते शरण येण्याऐवजी मागे पळू लागले. त्यानंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. 19 नोव्हेंबरला या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. चकमक परिसरात लष्कराकडून अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडले

3 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील दिगवार सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर लष्कराने घुसखोरी हाणून पाडताना तीन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले होते. यावेळी दोन दहशतवादी फरार झाले असले तरी. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी 31 ऑक्टोबर रोजी लष्कराने कुपवाडा येथे घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले होते, त्यावेळी 2 पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते. 26 ऑक्टोबरला कर्नाह सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. यादरम्यान एक पाकिस्तानी दहशतवादीही मारला गेला. तर एक दहशतवादी फरार झाला होता.

टेरर फंडिंगवर लगाम

सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जवळपास आणखी 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात यूएपीएअंतर्गत कारवाई केली जात आहे. सूत्रांनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौऱ्यात अतिरेकी आणि त्यांना सहानुभूती दाखवणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले होते.

इसिस, अल-कायदाचे दक्षिण आशियासमाेर आव्हान

अफगाणिस्तानात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर दक्षिण आशियातील परिस्थितीत बदल झाला आहे. यातून अल-कायदा व इसिस संघटनेचा प्रभाव वाढू लागला आहे. यातून या क्षेत्रासमाेर आव्हान निर्माण झाले आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवठा हाेऊ नये यासाठी विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने आयाेजित मंत्रीस्तरीय परिषदेत शुक्रवारी शहा बाेलत हाेते. येथे वाचा पुर्ण बातमी

अनेक प्रतिबंधित दहशतवादी संघटना कमकुवत झाल्यानंतर एकत्र काम करू लागल्या. मुंबईतील टेरर फंडिंग प्रकरणाच्या तपासात एनआयएला कळले की 1993 च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिम ड्रग्ज, मालमत्ता आणि तस्करीच्या माध्यमातून लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांसाठी पैसा उभा करत आहे.काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवादी संघटनांकडून निधी आणि शस्त्रे मिळत असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मद ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या बंडखोर गटांना आणि नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...