आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसखोरीचे दोन प्रयत्न फसले:जम्मूमध्ये सीमा ओलांडताना एका दहशतवाद्याचा मृत्यू, दुसऱ्याला अटक

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा बीएसएफने खात्मा केला आहे. सोमवारी रात्री उशिरा अडीचच्या सुमारास घुसखोर जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. ही माहिती वृत्तसंस्थेने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला, मात्र ते शरण येण्याऐवजी पळू लागले. त्यानंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याचवेळी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जम्मूमध्येच अटक करण्यात आली आहे.

यापुर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एलओसीजवळ भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता.

टेरर फंडिंगवर लगाम

सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जवळपास आणखी 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात यूएपीएअंतर्गत कारवाई केली जात आहे. सूत्रांनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौऱ्यात अतिरेकी आणि त्यांना सहानुभूती दाखवणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले होते.

सीमेपलीकडील अतिरेक्यांनी लाँचपॅड बदलले

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे सीमेपलीकडील अतिरेक्यांनी आपले तळ जम्मू क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवले आहेत. गुप्त माहितीनंतर लष्कर व सुरक्षा रक्षकांनीही धोरण बदलले आहे. अतिरेकी संघटनांचे हँडलर सीमेवरील कुंपण तोडून घुसखोरी करणाऱ्या छोट्या गटांना ढकलण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षा दलांनी घुसखोरीची अनेक संभाव्य ठिकाणे शोधून गस्त वाढवली आहे. घुसखोरी रोखण्याचे धोरण आखण्यासाठी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आव्हानांच्या व्यापक समीक्षेसाठी सोमवारपासून दिल्लीत ५ दिवसांची बैठक घेत आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, काश्मिरातील उंच भागांत बर्फवृष्टीनंतर अतिरेक्यांचा संपूर्ण फोकस जम्मू सीमेकडील सियालकोट सेक्टरच्या मैदानी भागातील लाँचिंग पॅड्सवर आहे.

बातम्या आणखी आहेत...