आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Military Cross border Training For Terrorists Intelligence Claims; News And Live Updates

कुरापती सुरूच:पाक सैन्याचे दहशतवाद्यांना पुन्हासीमापार प्रशिक्षण - गुप्तचरांचा दावा; जम्मू-काश्मीरमधील राजकीय घडामोडींमुळे तिळपापड

जम्मूएका महिन्यापूर्वीलेखक: मोहित कंधारी
  • कॉपी लिंक
  • रविवारी रात्रीपासून सैनिकांनी अतिरेक्यांना घेरले होते.

पाकिस्तानचे सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांना नव्याने प्रशिक्षण देत आहे, असा दावा गुप्तचर यंत्रणेने केला आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर हा माहिती समोर आली आहे. नियंत्रण रेषेवर २५ फेब्रुवारीपासून शांतता आहे. परंतु सीमापार भागात पाकिस्तानच्या सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. काही भागांत पाकिस्तानचे सैन्य नियमितपणे सैनिकांसमवेत दहशतवाद्यांनाही प्रशिक्षण देत आहेत.

अलीकडेच पीआेकेमध्ये अशा प्रकारचा एक लष्कर सराव झाला आहे. त्यात मोठ्या संख्येने नवे चेहरे दिसून आले आहेत. या सैन्य प्रशिक्षण कार्यक्रमाला तस्खीर-ए-जबल असे नाव देण्यात आले होते. त्याचा अर्थ डोंगराला ताब्यात घेणे होय. त्यात गनिमी तसेच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गुप्तचर यंत्रणेने आधीच हायअलर्ट दिला आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेपलीकडून कोणत्याही घुसखोरीला रोखता येणे शक्य होऊ शकेल.

पाकिस्तानच्या सैन्याने अलीकडे पुंछ सेक्टर, कोटली, मंगला व भिम्बरच्या रावलकोटमध्ये तोलीपीरच्या भागात लष्करी सराव केला. त्याला पाकिस्तानच्या घुसखोरीचा पारंपरिक मार्ग मानला जाते. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले, आम्ही चौकस आहोत. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना पूर्ण होऊ देणार नाहीत.

तरुणांचे प्रमाण आता घटले
काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत स्थानिक तरुणांत दहशतवादी होण्याच्या घटनांत घट झाली आहे. श्रीनगरमध्ये तैनात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, यंदा मेपर्यंत सुमारे ४०-५० स्थानिक तरुण विविध दहशतवादी संघटनांत सहभागी आहेत. २०२० च्या पहिल्या नऊ महिन्यांत सुमारे १३०, २०१९ मध्ये १४०, २०१८ मध्ये २१० हून जास्त स्थानिक तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग निवडला होता. त्या आधी काश्मीर खोऱ्यातील तरूण मोठ्या संख्येने मूळ प्रवाहापासून भरटकला होता.

उत्तर काश्मिरात २२० दडून बसले
भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोऱ्यात २२० सक्रिय दहशतवाद्यांपैकी ९०-१०० परदेशी आहेत. त्यापैकी बहुतांश उत्तर काश्मीरमध्ये दडून बसले आहेत. सध्या हे दहशतवादी बचावासाठी परस्परांच्या ठिकाणांवर येत नाहीत. त्यांनी ग्रेनेड फेकणे, शस्त्रे हिसकावणे व निमलष्करी दलांवर हल्ला करण्याची रणनीती ठरवली आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांत घट झाली असली तरी गेल्या १८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये २८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

लष्करच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुदासिर पंडितसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही चकमक रविवारी सायंकाळी बारामुला जिल्ह्यातील सोपोरच्या गुंड ब्रथ भागात सुरू झाली. सुरक्षा दलांनी रविवारी उशिरा रात्री तपास सुरू केला होता. खात्मा झालेल्यात एक पाकचा नागरिक आहे.

बातम्या आणखी आहेत...