आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pakistani Navy Entered Into Indian Ocean And Kidnapped 45 Fishermen, Also Took 8 Boats Of Fishermen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकच्या निशान्यावर मच्छिमार:पाकिस्तानी नेव्हीने भारताच्या समुद्री हद्दीत घुसून केले 45 मच्छीमारांचे अपहरण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाई झाली आहे. बुधवारी पाकिस्तानी नेव्ही कडून गुजरात जवळील भारतीय समुद्री सीमेत घुसून 45 मच्छीमारांचे अपहरण करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांच्या 8 बोटही सोबत नेल्या. यातील 6 बोट पोरबंदर आणि 2 वेरावलच्या होत्या.

कुटुंबियांनी सरकारकडे मदत मागितली

पाकिस्तानी नेव्हीच्या या कृत्याने गुजरातमधले मच्छीमार नाराज झाले आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचे मागणी केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या ताब्यातून बचावलेल्या मच्छिमारांनी सांगितले की ते भारतीय सीमेमध्ये मासे पकडत होते. यादरम्यान, पाकिस्तानी नौदलाने त्यांच्या साथीदारांना घेऊन गेले. गुजरातची लांब समुद्री सीमा पाकिस्तानला लागून आहे. पाकच्या या कृत्यामुळे इंडियन कोस्ट-गार्ड सतर्क झाले आहेत.

यापूर्वी 17 मच्छिमारांना बंधक बनवले होते

पाकिस्तान कोस्ट गार्डने याप्रकारे 17 फेब्रुवारीला सौराष्ट्रच्या 17 मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह बंधक बनवले होते. सध्या ते सर्व मच्छीमार कराचीच्या तुरुंगात बंद आहेत. पाकिस्तानी नेव्हीचा दावा आहे की, ते सर्व मच्छीमार पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते.