आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Terrorist Arrested From Delhi; AK 47, 50 Bullets, Hand Grenade And Indian Passport Recovered

पोलिसांची कारवाई:दिल्लीतून पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47, 50 गोळ्या, हँड ग्रेनेड आणि भारतीय पासपोर्ट जप्त

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी सकाळी दिल्लीतील लक्ष्मीनगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव सांगितले जात आहे. तो पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल येथील रहिवासी आहे.

दहशतवाद्याजवळून AK-47, 50 गोळ्या आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. त्याच्याजवळ भारतीय पासपोर्ट देखील सापडला आहे. पोलिसांना त्याच्याजवळून एक बनावट आयडी देखील सापडला आहे. ज्यामध्ये दिल्लीच्या शास्त्री नगरचा पत्ता लिहिला आहे. या आयडीमध्ये त्याचे नाव अली अहमद लिहिले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

बातम्या आणखी आहेत...