आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pakistan's Relations With The Gulf Are Bitter; India Benefits In Employment trade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तणाव:आखातासोबत पाकचे संबंध कटू; राेजगार-व्यापारात भारताला लाभ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाेव्हेंबर-डिसेंबरमध्ये २० हजार पाकिस्तानींचे यूएईमध्ये गेले राेजगार, भारतीयांना संधी

दहशतवादास समर्थन देणे आणि सुधारणावादी वाटेवरून चालण्यास नकार देणे आता पाकिस्तानला कठीण जात आहे. एकेकाळी मदतीसाठी नेहमी उभे राहणारे साैदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती (यूएई) सारखे देश आता पाकिस्तानपासून दूर राहणे पसंत करतात. त्याचा सर्वात माेठा लाभ भारताला मिळू लागला आहे. या दाेन्ही इस्लामी देशांसाेबत भारताचे संबंध बळकट आहेत. द्विपक्षीय व्यापारही अनेक पटीने वाढला आहे. साेबतच तेथील भारतीय नागरिकांना राेजगाराच्या संधी वाढल्या आहेत. यूएईने नाेव्हेंबरच्या अखेरीस १३ देशांतील नागरिकांवर व्हिसा बंदी लागू केली हाेती. त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. या बंदीमुळे सुमारे २० हजार पाकिस्तानींनी यूएईमध्ये राेजगार गमावले आहेत. त्यापैकी सुमारे ८० टक्के नाेकऱ्या भारतीयांना मिळाल्या आहेत. काेराेना महामारीमुळे ही बंदी असल्याचे यूएईने अनेक वेळा सांगितले. परंतु यूएईने बंदी लावली हाेती. तेव्हा भारतात पाकिस्तानच्या तुलनेत १० लाख लाेकसंख्येच्या समुदायातून काेराेनाचे जास्त रुग्ण समाेर येत हाेते. त्यानंतरही यूएईने भारतीय लाेकांवर व्हिसाची बंदी लावली नाही. अाखाती देश आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. जगाला केवळ तेल निर्यात करण्याची त्यांची इच्छा नाही. पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातही लाेकांना भेटीचे आवाहन ते करत आहेत. त्यासाठी भारत व इस्रायलसारख्या देशांसाेबत चांगले संबंध असणे गरजेचे आहे.

८७ टक्के पाकिस्तानींची सौदी-यूएईला भेट
पाकिस्तानसाठी सौदी व यूएईचे महत्त्व पाक सरकारने दिलेल्या आकड्यावरून लक्षात येतात. २०१९ मध्ये देशाबाहेर रोजगाराच्या शोधात बाहेर पडलेल्या एकूण पाकिस्तानी उमेदवारांपैकी ८७ टक्के लोक सौदी किंवा यूएईला गेले. तेव्हाही सौदीत सुमारे २६ लाख व यूएईत सुमारे १५ लाख पाकिस्तानी काम करतात. यूएईमध्ये भारतीयांची संख्या पाकिस्तानी लोकांच्या तुलनेत जास्त आहे. तेथे २६ लाख भारतीय काम करतात. सौदीत १५ लाख भारतीय आहेत.

इस्रायलच्या मुद्द्यावरही पाकवर साैदीची नाराजी
साैदी अरब व यूएई आता इस्रायलसाेबतचे जुने शत्रुत्व विसरून संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत. यूएई व इस्रायलने एेतिहासिक अब्राहम करारही केला आहे. साैदी व यूएईच्या म्हणण्यानुसार पाकिस्ताननेही इस्रायलला परवानगी द्यावी. परंतु तुर्कीने इस्रायलला खूप आधीपासून मान्यता दिली आहे. त्याशिवाय इस्रायलमध्ये तुर्कीचा दूतावासाही आहे. अनेक मुद्यांवरून पाकिस्तान आणि सौदी यांच्यातील दरी वाढू लागली आहे.

तुर्कीशी जवळीक वाढवल्याने नाराज
भारताने काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. तेव्हा साैदी व यूएई त्यास विराेध करतील, अशी पाकिस्तानची अपेक्षा हाेती. परंतु तसे काही घडले नाही. तुर्कीने मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला. पाकिस्तान तेव्हापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कीसाेबत आहे. त्यामुळे साैदी प्रचंड नाराज आहे. साैदी व तुर्की दाेन्ही स्वत:ला मुस्लिम जगतात सर्वात प्रभावी देश मानतात. त्यातूनच तुर्कीने पाकिस्तानला लवकरात लवकर ३०० काेटी डाॅलरचे कर्ज परत करण्यास सांगितले आहे.

पैसे परत करा : सौदी
यूएई व साैदी अरेबियासाेबत दीर्घकाळ तणावाचे संबंध ठेवणे पाकिस्तानला शक्य दिसत नाही. गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये या देशांत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी सुमारे ८.३ हजार काेटी रुपये मायदेशी पाठवले. नेहमी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडे याचना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हे संजीवनीसारखे असते. परंतु आता क्षेत्रीय संबंधाचे परिणाम व्यापार आणि परदेशी गंगाजळीवरही होत असल्याने पाकच्या नाड्या आवळतील.

बातम्या आणखी आहेत...