आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूत मुख्य विराेधी व दिवंगत जयललिता यांचा पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्या पक्षात एकल नेतृत्वावरून कलह सुरू आहे. गुरुवारी के. श्रीवारू वेंकटचलपती पॅलेसमध्ये एका बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते. त्यात माजी उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम तसेच संयुक्त समन्वयक ई पलानीसामी सहभागी झाले. परंतु या बैठकीत गदाराेळ पाहायला मिळाला. बैठकीदरम्यान मंचावरील पक्षाचे समन्वयक व माजी उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकण्यात आल्या. परिस्थिती लक्षात घेऊन पनीरसेल्वम यांना हाॅलमधून पळ काढावा लागला. त्यामुळेच बैठकीत विषयपत्रिकेनुसार २३ प्रस्तावांवर चर्चा होऊ शकली नाही. कारण पलानीसामी यांचे समर्थक एक नेतृत्वाच्या मागणीवर ठाम आहेत. पक्षातील फूट टाळण्यासाठी तमिल मगन हुसेन यांची पक्षाच्या बैठकीचे नेतृत्व करण्यासाठी सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पक्षाची पुढील बैठक ११ जुलै राेजी होईल, असे हुसेन यांनी स्पष्ट केले.
एका नेतृत्वाची मागणी पूर्वीही झाली होती. पलानीसामींच्या पाठीराख्यांनी ती केली होती. त्यानंतर पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी पाेस्टर लावून भावना जाहीर केल्या. पनीरसेल्वम यांची दिवंगत जयललिता यांनी नेता म्हणून निवड केली होती, असे त्यात म्हटले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१७ मध्येदेखील व्ही. के. शशिकला यांच्या परिवाराच्या हातात पक्षाची सूत्रे जात असल्याच्या विराेधात बंड पुकारले होते. वास्तविक त्यांच्या अनेक समर्थकांनी पलानीसामींची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता.
कोर्टाकडून दिलासा
खासदार व समर्थकांत घट झाल्यानंतर पनीरसेल्वम यांनी गुरुवारची बैठक राेखण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडला. त्यात पलानीसामी यांची पक्षाचा क्रमांक एकचा नेता म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली होती. मद्रास हायकोर्टाने बुधवारी बैठक राेखण्यास नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.