आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Palestine Israel Conflict Updates: Families Who Lost Children In The Palestine Israel Conflict Are Forgiving Their Killers; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्षात मुले गमावणारी कुटुंबे त्यांच्या मारेकऱ्यांना माफ करत आहेत, त्यांची प्रेरणा भारत आणि गांधीजींचे अहिंसा आंदोलन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायल-पॅलेस्टाइनदरम्यान शांततेच्या मार्गाचा शोध, दुरावलेल्या लोकांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न

इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये नुकतीच युद्धबंदी झाली, पण या पेचातून नवा मार्ग निघणार का? या युद्धात मुलगा गमावलेल्या इस्रायलच्या रॉबी डेमलिन आणि मुलगी गमावलेल्या अरामिन यांनी आपल्या मुलांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे. ज्यांनी युद्धात मुले गमावली अशा पालकांना एकत्र आणून त्यांनी पॅरेंट्स सर्कलही तयार केले आहे. या समूहात इस्रायली लष्करातील माजी सैनिक आणि पॅलेस्टाइनतर्फे लढलेले दहशतवादी शांततेचा मार्ग शोधण्यासाठी येत आहेत. या मोहिमेबाबत त्यांनी मीडिया प्लॅटफॉर्म इन्क्वायरीशी चर्चा केली. त्याचा सारांश...

कृष्णवर्णीय मारेकऱ्यांना माफ करणाऱ्या श्वेतवर्णीय महिलेमुळे प्रभावित झाले आहे
माझा मुलगा डेव्हिडला पॅलेस्टिनींना मारल्याचे कळले तेव्हा मी म्हणाले की त्यांनी डेव्हिडला मारले नाही तर त्याच्या लष्करी गणवेशाला मारले. मी मुलाच्या मारेकऱ्याच्या कुटुंबाला पत्र लिहिले. मी दक्षिण आफ्रिकेला गेले होते, तेथे एका श्वेतवर्णीय महिलेने आपल्या मुलीच्या कृष्णवर्णीय मारेकऱ्यांना माफ केले होते. मी त्यामुळे प्रभावित झाले. मी न्याय आणि शांततेचे समर्थन करणाऱ्या कुटुंबातील आहे. माझे चुलतभाऊ महात्मा गांधीजींसोबत पायी डर्बनहून जोहान्सबर्गला गेले होते. मी असा विचार करू शकते तर इतर पालक का नाही, असे मला वाटले. त्यामुळे आम्ही इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये पॅरेंट्स सर्कल तयार केले. खरी समस्या ही आहे की, आम्ही मुलांना इतिहास शिकवलाच नाही. पॅलेस्टिनी किंवा इस्रायली आपले शत्रू आहेत, एवढेच त्यांना सांगितले जाते. - रॉबी डेमलिन (इस्रायल)

इस्रायलचे माजी सैनिक भारतात आले, तर त्यांचे आयुष्य बदलले, आता संपूर्ण लष्कर पाठवावे
माझी मुलगी १० वर्षांची होती. शाळेबाहेर उभी असताना तिला मारण्यात आले. ती काही लष्करात नव्हती. तिच्या मारेकऱ्याला माफ करणे कसे शक्य आहे? पण मी १८ वर्षांच्या त्या मुलाला भेटून म्हणालो, तुला माफ केले. दोन वर्षांनंतर पुन्हा भेटलो असता तो बदललेला होता. त्याला पश्चात्ताप झाला होता. हाच माझा सूड होता. पॅरेंट्स सर्कलअंतर्गत इस्रायलचे माजी लष्करी अधिकारी आणि माजी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची बैठक ठेवली. बंदुकीशिवाय प्रथमच सुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी मान्य केले. चौकशीत कळले की, या अधिकाऱ्यांना काही दिवस भारतात पाठवले होते. तेव्हा हा बदल झाला. हिंसेबाबत विचार करू नये यासाठी इस्रायलच्या पूर्ण लष्करालाच भारतात पाठवावे, असा सल्ला मी दिला. भारताने अहिंसेच्या बळावरच शक्तिशाली देशाला झुकवले होते. हेच धोरण सर्वश्रेष्ठ आहे.- बासम अरामिन (पॅलेस्टाइन)

बातम्या आणखी आहेत...