आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणातील पलवलमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एका खासगी शाळेच्या धावत्या बसला अचानक आग लागली. यामुळे विद्यार्थ्यांनी जीवाच्या आकांताने एकच आरडाओरडा केला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले. काही वेळातच संपूर्ण बस भस्मसात झाली. या घटनेत विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचा पूर्णतः कोळसा झाला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी जुन्या GT रोडवरील शहर ठाण्यालगत एक धावती स्कूल बस पेटली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात रस्त्या शेजारच्या दुकानांवरील साइन बोर्डही जळाले. हे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
बसमधील स्कूल बॅग जळाल्या
या घटनेची अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत विद्यार्थी थोडक्यात बचावले. पण त्यांची दप्तरे जळून राख झाली.
शालेय प्रशासनाचे हात वर
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही स्कूल बस ज्या शाळेची होती, त्या शाळेने या बसशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पालकांनीच ती हायर केली होती. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाहा अपघाताचे फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.