आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पश्चिम बंगाल भाजप युथ विंगच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दरम्यान, गोस्वामी यांनी कोर्टाला सांगितले की, त्यांना या षडयंत्रात अडकवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्याची मागणी केली. ते म्हणाले की या प्रकरणाची CID चौकशी झाली पाहिजे.
पामेला म्हणाल्या की, विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय राकेश सिंह यांना अटक करण्यात यावी. मात्र पालेमा यांना सिंह यांच्या अटकेची मागणी का केली आहे याविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही.
पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल : सूर्या
तर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार तेजस्वी सुर्या यांनी पामेला प्रकरणावर म्हटले की, सर्वांसाठी कायदा एकच आहे. काय चूक आणि काय बरोबर आहे हे आम्ही वेळेनुसार शोध लावू. योग्य वेळी पक्षाचे राज्य अध्यक्ष निर्णय घेतील.
पोमेला यांच्या आई म्हणाल्या - माझी मुलगी निर्दोष
दुसरीकडे पामेला यांच्या आई मधुचंदा गोस्वामी म्हणाल्या आहेत की, माझी मुलगी चुकीची नाही. तिला फसवले जात आहे. आम्ही मिडल क्लास लोक आहोत. आम्हाला काय माहित कोकेन काय असते?
19 फेब्रुवारीला केली होती अटक
पामेला आणि तिचे सोबती प्रबीर कुमारला पोलिसांनी शुक्रवारी कोकेनसह अटक केली होती. पामेला यांच्या बॅगमधून 100 ग्राम कोकीन आढळले होते. बाजारात याची किंमत जवळपास पाच लाख रुपये सांगितली जात आहे.
बंगाल भाजप यूथ विंगच्या सेक्रेटरी आहेत पामेला
पामेला गोस्वामी भाजप यूथ विंगची सेक्रेटरी आहे. यासोबतच हुगली जिल्हा भाजपच्या सचिव आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह दिग्गज नेत्यांचा फोटो ठेवलेला आहे.
नश्याच्या व्यवसायाशी पोमेला यांचे कनेक्शन : पोलिस
पोलिस म्हणाले आहेत की, पामेला आणि प्रबीर यांच्यात दिर्घकाळापासून मैत्री आहे. पोलिसांना खूप दिवसांपासून संशय होता की, ती नश्याच्या व्यवसायाशी संबंधीत आहे. पोलिस त्यांच्यावर नजर ठेवत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.