आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Panchayat Members In Kashmir, Lieutenant Governor For Security Of Leaders; Terrorist Attacks In 5 Weeks, Panic Over Killing Of 5 BJP Leaders

ग्राउंड रिपोर्ट:काश्मिरात पंचायत सदस्य-नेत्यांचे सुरक्षेसाठी उपराज्यपालांना साकडे; 5 आठवड्यांत दहशतवादी हल्ले, 5 भाजप नेत्यांच्या हत्येने घबराट

मुदस्सीर कुल्लू । श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सरपंच, भाजप कार्यकर्त्यांना या इमारतीत ठेवण्यात आले आहे. - Divya Marathi
सरपंच, भाजप कार्यकर्त्यांना या इमारतीत ठेवण्यात आले आहे.
  • 40 सदस्य - नेत्यांचे राजीनामे, नड्डांना पत्र
  • भाजप नेते-पंचायत सदस्यांची भूमिका : सुरक्षा मिळत नाही तोवर घरातच मुक्काम

काश्मीरमध्ये पंचायत सदस्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे स्वत:च्या सुरक्षेबाबत साकडे घातले आहे. दुसरीकडे सुरक्षा प्रदान केली जात नाही तोपर्यंत घरातून बाहेर पडू नका, असे भाजपने स्पष्ट केले आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या पाच वर्षांत पंचायत सदस्य व भाजप नेत्यांवर ६ दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यात भाजपच्या ५ नेत्यांचा मृत्यू झाला. आता इतर पंचायत सदस्य व भाजप नेत्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच सुमारे ४० पंचायत सदस्य व भाजप नेत्यांनी राजीनामेही दिले आहेत. अनेक सरपंच, पंच व इतर राजकीय कार्यकर्त्यांनी घर सोडले आहे. जम्मू-काश्मीर पंच सरपंच असोसिएशनने उपराज्यपाल मनोज सिन्हांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. असोसिएशनचे प्रमुख मौलवी तारीक म्हणाले, मी आणि अनेक पंचायत सदस्यांनी उपराज्यपालांची भेट घेतली. आमच्या जीविताला धोका आहे, असे आम्ही सिन्हा यांना सांगितले. आम्हाला सुरक्षा मिळायला हवी. दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे भाजपचे सरचिटणीस अशोक कौल यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले. काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात भाजप नेत्यांना सुरक्षित निवासाची व्यवस्था करून द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली. यादरम्यान उपराज्यपालांचे सल्लागार फारुक अहमद खान म्हणाले, सुरक्षा संस्था व प्रशासन पंचायत सदस्यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. काही लोकांना सदस्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम करू नये, असे वाटते. हल्लेखोरांना दंड देऊ.

भाजप नेते-पंचायत सदस्यांची भूमिका : सुरक्षा मिळत नाही तोवर घरातच मुक्काम

दक्षिण काश्मीरचे भाजप प्रभारी वीर सराफ म्हणाले, आम्ही आमचे जीवन संकटात का टाकावे? आम्हाला काम बंद करण्याबद्दल धमकी दिली जात आहे. सुरक्षा मिळत नाही तोवर आम्ही घराबाहेर पडणार नाही. कुंड क्षेत्रातील भाजपचे अध्यक्ष निसार अहमद वानी म्हणाले, मी भाजपचा राजीनामा दिला आहे. तणावापासून दूर राहणे हिताचे आहे. कुटुंबासोबत आनंदाने राहणेच बरे. दक्षिण काश्मीरमधील मट्टनचे नगरसेवक राकेश कौल म्हणाले, गेल्या एक वर्षापासून काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात झाली. पंचायत सदस्यांची सुरक्षा हा मोठा मुद्दा आहे. परंतु ९९ टक्के लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची व्यवस्था नाही. कुलगामच्या चौगामचे भाजपचे सरपंच विजय रैना म्हणाले, पंच, सरपंच व नगरसेवकांना सरकारने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. १५ ऑगस्टनंतर आम्हाला अशी सुरक्षा मिळेल.

हल्ले : ८ दिवसांत ३ भाजप नेत्यांची हत्या केली, एका नेत्याचे अपहरणही केले होते

दहशतवाद्यांनी ८ जुलै रोजी बांदीपुरामध्ये भाजप नेता वसीम बारी, त्यांचे वडील व भावाची गोळी मारून हत्या केली होती. काझीगुंडमध्ये ५ ऑगस्ट रोजी दोन सरपंच सजाद अहमद व आरिफ अहमद यांचीही हत्या केली होती. हे दोघेही भाजपचे सदस्य होते. बडगाममध्ये ८ ऑगस्टला भाजप नेता अब्दुल हामिद नजर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याआधी १५ जुलै रोजी सोपोरमध्ये भाजप नेता मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण झाले होते. त्यांची दहा तासांनंतर सुटका झाली होती.

बातम्या आणखी आहेत...