आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पँडोरा पेपर्स:4 भारतीय संस्था बड्या व्यक्तींच्या परदेशी संपत्तीची चौकशी करणार, पेपर्समध्ये या भारतीयांवर आरोप

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

करदात्या देशांत छुपी मालमत्ता घेण्याच्या पडताळणीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. यात व्यापारी, ४ नेते आणि इतरांचा समावेश आहे. तथापि, सध्या काही नावेच समोर आली आहेत. ही अशी गुंतवणूक आहे, जिची माहिती सरकारी संस्थांना दिली गेली नाही. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले की, विविध संस्था याप्रकरणी चौकशी करतील. यात ईडी, आरबीआय, आयकर विभाग आणि एफआययू यांचा समावेश आहे. सरकार यासंबंधीची माहिती विदेशातून मिळवण्यासाठी पावले उचलेल.

शोध पत्रकारांची संस्था इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्सचा (आयसीआयजे) पँडोरा पेपर्स नावाच्या अहवालात पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी, जॅकी श्राॅफ, किरण मजुमदार शाॅ यांच्या पतीचेही नाव आहे. भारतासह ९१ देशांतील ३५ आजी व माजी राष्ट्राध्यक्षांची व ३३० हून अधिक नेते व अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पेपर्समध्ये या भारतीयांवर आराेप {इक्बाल मिर्ची {नीरा राडिया {जॅकी श्राॅफ {अनिल अंबानी {सचिन तेंडुलकर {विनोद अदानी {किरण मजुमदार शॉ { समीर थापर {पूर्वी मोदी {अजित केरकर {कॅप्टन सतीश शर्मा.

गुंतवणूक कायदेशीररीत्या वैध : तेंडुलकर सचिन तेंडुलकरच्या वकिलाने म्हटले की, माजी क्रिकेटपटूची गुंतवणूक कायदेशीररीत्या वैध आहे. त्याबाबत कर अधिकाऱ्यांना माहिती आहे.

- शाॅ यांनी पतीचा ट्रस्ट वैध असल्याचे सांगितले : बायाेकाॅनच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन किरण मजुमदार शाॅ म्हणाल्या की, त्यांच्या पतींचा विदेशातील ट्रस्ट पूर्णपणे वैध आहे. तो पूर्णपणे स्वतंत्र ट्रस्टी चालवतात.

- टोनी ब्लेअर, पुतीन आणि शकिराचेही नाव: अहवालानुसार जॉर्डनच्या शहांनी ब्रिटन आणि अमेरिकेत छुप्या रीतीने सात कोटी पौंडची संपत्ती खरेदी केली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नीने लंडनमध्ये कार्यालय खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरले नाही आणि ३.१२ लाख पौंड वाचवले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मोनॅकोतील संपत्तीशी लिंक असल्याचेही समोर आले आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर शकिराचेही यात नाव आहे.

इम्रान खानचेे मंत्रीही, राजीनाम्याची मागणी : यादीत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानच्या काही मंत्र्यांची नावे आहेत. अर्थमंत्री शौकत तारिन, जलसंधारणमंत्री मुनीस इलाही, खासदार फैसल वावडा, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियारच्या कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातलग इश्हाक डार यांचेही नाव समोर आले. मंत्र्यांच्या नावे बेहिशेबी संपत्तीचे प्रकरण उघड झाल्याने विरोधी नेत्यांनी इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...