आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुत्र्याच्या पिलांना पिकअपखाली चिरडणाऱ्या चालकाला पकडून त्याला पिलांच्या आईची माफी मागायला लावण्यात आल्याची घटना हरियाणाच्या पानिपतमधून समोर आली आहे. विनोद असे या चालकाचे नाव असून तो समालखातील चुलकाना गावचा रहिवासी आहे. विनोदने चार दिवसांपूर्वी एका गल्लीतील रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुत्र्याच्या 2 पिलांवर जाणीवपूर्वक पिकअप चढवून त्यांना चिरडले होते.
यानंतर नई पहल वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांच्या सहाय्याने विनोदला पकडले. त्यानंतर विनोदला कुत्र्यांना जिथे चिरडण्यात आले तिथे नेण्यात आले. तिथे त्या पिलांच्या आईलाही आणण्यात आले होते. यानंतर विनोदने सर्वांसमोर पिलांच्या आईचे पाय धरत तिची माफी मागितली.
यानंतर आयुष्यभर नशा करून वाहन चालवणार नाही आणि अशी चूक पुन्हा करणार नाही अशी कबुली त्याने पिलांच्या आईसमोर दिली. यानंतर उपस्थितांच्या सहमतीने समज देऊन विनोदला सोडून देण्यात आले.
जाणीवपूर्वक पिलांना चिरडले
रस्त्यावर कुत्र्यांची पिले दिसत असतानाही विनोदने त्यांच्यावर पिकअप चढवली होती. हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर नई पहल वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांच्या सहाय्याने पिकअप चालकाचा शोध घेत त्याला पकडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.