आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक तयारी:भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक; नाराज पंकजा मुंडेंनी घेतली मोदींची भेट, सरचिटणीसांच्या सहा तास मॅरेथॉन बैठका

नवी दिल्ली, बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोदींची पक्षातील नेत्यांशी चर्चा

पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तासभर बैठक झाली. आपली भगिनी तसेच खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने पंकजा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

मोदी यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सर्व सरचिटणासांची बैठक झाली. यात पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर तसेच निवडणूकीच्या तयारीबाबत विचारमंथन करण्यात आले. ही बैठक पाचतास चालली. त्यानंतर हे सर्व सरचिटणीस,इतर पदाधिकारी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी नड्डा यांनी सचिवांच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती मोदींना दिली. यावेळी राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल.संतोष यांचीही उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनीही मोदी यांची भेट घेतली मात्र त्याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

रा.स्व. संघ-भाजप समन्वयासाठी अरुणकुमार यांची नियुक्ती
नवी दिल्ली |भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील समन्वयक म्हणून संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी संघाने हा महत्वपूर्ण बदल केला. सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ हे सन २०१५ पासून समन्वयकाची जबाबदारी पार पाडत होते त्यांच्या जागी अरुणकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नियुक्तीला दुजोरा दिला.

पंकजा मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र
प्रीतम मुंडे यांना डावलल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील पंकजा समर्थक दोन जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य आणि पक्षातील सुमारे ५५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीडप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील पंकजा समर्थकांनीही राजीनामे दिले आहेत.

पंकजांनी मुंबईत बोलावली समर्थकांची बैठक
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडेंना मंत्रिपदी डावलल्यानंतर बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. मागील दोन दिवसांत ५५ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिले आहेत. दरम्यान, राजीनाम्याचे हे लोण इतर जिल्ह्यांमध्येही पसरू लागले आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंनी मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, भाजपचे आजी, माजी आमदार यांची बैठक मुंबईतील वरळी कार्यालयात बोलावली आहे.

मोदींची दुसरी बैठक : गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्या निवासस्थानी बैठक घेतली होती. ही बैठक सुमारे चार तास चालली होती. तर गतवर्षी राष्ट्रीय सरचिटणीसांची नियुक्ती केल्यानंतर नड्डा यांनी सरचिटणासांची घेतलेली ही पहिलीच बैठक होती.

दुसऱ्यांदा डावलले
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली होती. त्यांच्याऐवजी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर आता डॉ. प्रीतम मुंडे यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही.

बातम्या आणखी आहेत...