आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे समर्थकांचा राडा:औरंगाबादेत भाजप कार्यालयासमोर आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये गुरुवारी भाजप कार्यालायासमोर पंकजा मुडे समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झालेत. त्यांनीच भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन केल्याचे समजते. मात्र, भाजप शहराध्यक्षांनी हे भाजप कार्यकर्ते नसल्याचे म्हटले आहे. या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.

नेमके प्रकरण काय?

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रथम राज्यसभा आणि आता विधान परिषदेसाठी नाकारल्यामुळे त्यांच्या चार समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर आज घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे यांना पक्षात सातत्याने डावलले जात असल्याची भावना पंकजा मुंडे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे या संभाव्य उमेदवार होत्या. परंतु, कर्जत-जामखेड मतदार संघाचे माजी आमदार, धनगर समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव दिल्लीतून निश्चित झाल्यामुळे पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे समर्थकांनी औरंगाबाद येथील भाजप विभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

भाजप शहराध्यक्ष म्हणतात...

भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांना यासंबंधी विचारले असता संबंधित कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयाची कुठलीही तोडफोड करण्यात आलेली नाही. तसेच, संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती केनेकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...