आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूर:कुख्यात पपलाने मैत्रिणीलाही फसवले; मानसिंह बनून लग्न करत कोल्हापूरमध्ये स्थिरावण्याची होती योजना

जयपूर / राजेंद्र गौतम24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या गँगस्टरला दोन दिवस कैद, मैत्रिणीला 7 दिवसांची कोठडी

महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून बुधवारी अटक करण्यात आलेला मोस्ट वाँटेड गुंड पपला गुर्जरने केवळ पोलिसांनाच फसवले नाही तर ज्या मैत्रिणीसोबत तो राहत होता तिलाही अंधारात ठेवले होते. वरिष्ठ सूत्रांनी सांगितल्यानुसार पपला गुर्जरने मैत्रीण झिया उससहर सिगलीगरला त्याचे नाव मानसिंह सांगितल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती, नंतर प्रेम झाले. पपला तिच्याशी लग्न करणार होता. झिया घटस्फोटित आहे. याचाच फायदा घेत पपलाने तिच्यासोबत जवळीक वाढवली. लग्न करून पपलाला कोल्हापूरमध्ये वास्तव्य करायचे होते. काही महिन्यांपूर्वी पपला दुसऱ्या एका मराठी मुलीसोबत होता. मात्र झियाच्या संपर्कात आल्यानंतर त्याने पहिल्या मुलीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. मात्र पपला पकडला गेल्यानंतर तरुणी वारंवार पोलिस आणि कमांडोकडून घटनेची माहिती घेत होती. शेवटी पुणे विमानतळावर दोघांची भेट झाल्यानंतर युवतीने पपला विचारले की, तू आहेस तरी कोण? यावर पपलाने सांगितले की, मी विक्रम गुर्जर ऊर्फ पपला आहे. हरियाणा व राजस्थान पोलिसांनी माझ्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पोलिस सूत्रांनुसार, पपलाचे वास्तव समजल्यानंतर झियाला मोठा धक्का बसला. पोलिस तिची जेव्हाही चौकशी करता तेव्हा ती जोरजोरात रडू लागते. तिला पपलाचे आधार कार्डवरील नाव उदलसिंहबाबत माहिती नव्हती. झिया अायुर्वेदमध्ये दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी तिला सात दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.

दरम्यान, कुख्यात गँगेस्टर पपला याला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यांनतर ओळख परेडसाठी २ दिवसांसाठी कारागृहात पाठवण्यात आले आहे. बहरोड ठाण्यातून पळून जाताना त्याच्याकडे १२ लाख रुपये होते. त्यातूनच त्याने स्वत:चा खर्च भागवल्याचे समोर आले.

पपला याला माहिती पुरवायचा पोलिस कर्मचारी
निमराणातील पोलिस कॉन्स्टेबल सुधीरकुमार याला पपला प्रकरणात माहिती लीक केल्याच्या आरोपात निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात इतर पोलिसांच्या भूमिकेबाबतही चौकशी सुरू आहे. विभागीय चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे. पपलाला हरियाणा किंवा इतर ठिकाणाहून काही जण पैसे पाठवत असल्याचे पपलाच्या फ्लॅटमधून आढळलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस त्याचीही चौकशी करत आहेत.