आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अमृतपालचा साथीदार पपलप्रीतला अटक, दोघेही 23 दिवसांपूर्वी अमृतसरमधून झाले होते फरार; सरेंडरची केली होती प्लॅनिंग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'वारिस पंजाब दे' चा प्रमुख अमृतपाल सिंगच्या अतिशय जवळचा सहकारी पपलप्रीत सिंगला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिस आणि सीआयएची ही संयुक्त कारवाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार पपलप्रीत सिंगला होशियारपूरमधून अटक करण्यात आले आहे. अमृतपाल सिंग आणि पपलप्रीत हे दोघेही होशियारपूरमधून विभक्त झाले होते. ते फरार होण्याच्या दिवशी सोबतच होते.

मिळालेल्या माहितीनुसार पापलप्रीत सिंग सरेंडर करण्याच्या तयारीत होता. त्याला अमृतसरमधील आपल्या गावात येऊन आत्मसमर्पण करायचे होते. त्यामुळेच पंजाबचे पोलिस डीजीपी गौरव यादवही आज अमृतसरला आले होते. मात्र शेवटच्या क्षणी पपलप्रीत सिंग होशियारपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सीआयए आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन करून कारवाई केली.

फरार झाल्यानंतर अमृतपाल आणि पपलप्रीत दुचाकीवरून फरार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.
फरार झाल्यानंतर अमृतपाल आणि पपलप्रीत दुचाकीवरून फरार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.

वाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या पपलप्रीतची कहाणी....

  • पपलप्रीत हा अमृतसरच्या मजिठा हलके येथील मार्डी कलान गावचा रहिवासी आहे. त्याची आई सरकारी शिक्षीका असून वडील शेतकरी आहेत. 2017 मध्ये पपलप्रीतने 'वारीस पंजाब दे' मध्ये सामील होण्यापूर्वी सिमरनजीत सिंग मान यांच्या खलिस्तान समर्थक पक्षात प्रवेश केला. याशिवाय तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर खलिस्तान चळवळीचा सतत प्रचार करत असे.
  • पंजाबमधील अकाली दल सरकारच्या काळात 2015 मध्ये सरबत खालसा बोलावण्यात आला होता. त्याचा एक आयोजक पपलप्रीत होता. तपासात पोलिसांनी पपलप्रीत सिंगवर आयएसआयशी संबंध असल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. 12 नोव्हेंबर 2015 रोजी अमृतसरमधील चाटीविंड पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पपलप्रीतच्या भडकाऊ भाषणाची नोंद करण्यात आली होती.
  • पपलप्रीत सिंग याने तुरुंगात असलेल्या बब्बर खालसाचा भयंकर दहशतवादी नारायण सिंग चौडा याचा प्रक्षोभक संदेश वाचून दाखवला. दरम्यान, जगतारसिंग हवारा यांची अकाल तख्तचे जत्थेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलिसांनी पपलप्रीत सिंग आणि इतर आयोजकांविरुद्ध कलम 124A, 153-A, 153-B, 115,117,120-B आणि यूएपीएच्या कलम 13(1) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66-F अंतर्गत गुन्हा दाखवला आहे.
होशियारपूरमध्ये अमृतपालचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला
होशियारपूरमध्ये अमृतपालचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला

अमृतपालचे मीडिया सल्लागार, एका परदेशी चॅनेलमध्ये पत्रकार
पपलप्रीत सुरुवातीपासूनच अमृतपालच्या खूप जवळचा आहे. पपलप्रीत हा अमृतपालचा मीडिया सल्लागारही आहे. 'वारीस पंजाब दे'चा कुठलाही कार्यक्रम असेल तर मीडियाची संपूर्ण व्यवस्था पपलप्रीत करत असे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालशी संबंधित प्रत्येक बातमी आणि सोशल अॅक्टिव्हिटीच्या प्रत्येक क्षणाची बातमी, सोशल मीडियावर काय पोस्ट करावे आणि काय करू नये, हे पपलप्रीतचे काम होते. पपलप्रीत एक यूट्यूब चॅनल देखील चालवतो. इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय आहे. परदेशी चालवल्या जाणाऱ्या चॅनल्समध्ये तो पत्रकार राहीला आहे. त्यांनी अनेक मुलाखतीही कव्हर केल्या आहेत.

18 मार्चपासून अमृतपाल फरार, NSAने 2 व्हिडिओ जारी
अमृतपाल सिंग गेल्या 18 मार्चपासून फरार आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्याविरुद्ध NSA (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गराड्याला चकमा देत अमृतपाल जालंधरमधील शाहकोट येथून पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांना त्याचे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ठिकाण सापडले. तरीही त्याला अद्याप पकडता आले नाही.

फरार झाल्यानंतर अमृतपालचे 28 तासांत 2 व्हिडिओ आणि एक ऑडिओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी अकाल तख्तच्या जथेदारांना 14 एप्रिलला बैसाखीच्या दिवशी तलवंडी साबो येथे सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केले होते. याशिवाय अमृतपालनेही आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही.

हे ही वाचा सविस्तर

शोधाशोध : अमृतपालसाठी 300 डेऱ्यांत सर्च ऑपरेशन, MP सिमरनजीत म्हणाले - सरेंडर करू नको, पाकला जा, ISI जवळ घेईल

वारिस पंजाब देचा म्होरक्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा सलग 14 व्या दिवशीही फरार आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल धार्मिक स्थळांमध्ये लपल्याची खबर आहे. त्यामुळे अमृतसर स्थित सुवर्ण मंदिरासह पंजाबच्या सर्वच धार्मिक स्थळांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

अमृतपाल कार सोडून बाईकवर पळाला:दाढी लहान करून वेश बदलला, पत्नी ब्रिटनमधून खलिस्तानसाठी करत होती फंडिंग

'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांनी आता आपला पेहराव बदलला आहे. शेवटच्या फुटेजमध्ये तो एका दुचाकीच्या मागे बसलेला दिसला आहे. त्याने काळ्या रंगाचा चष्मा, गुलाबी रंगाची पगडी, राखाडी रंगाची पँट आणि झिपर घातला होता. जो कृपाण नेहमी हातात ठेवायचा असतो तो ही त्याने सोडला. यासोबतच त्याने आपला लूक बदलण्यासाठी दाढीही कमी केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. - येथे वाचा संपूर्ण बातमी