आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालंधरच्या शहाकोट परिसरात पोलिसांना गुंगारा देत खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहसोबत पळालेल्या पपलप्रीत सिंहला पोलिसांनी २३ दिवसांनंतर अटक केली आहे. पपलप्रीत अमृतसरमध्ये शरणागती पत्करण्याचा प्लॅन बनवत होता, पण त्यापूर्वीच तो जेरबंद झाला. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यात आली. त्याचीही आसामातील दिब्रुगड तुरुंगात रवानगी केली जाईल.
पोलिस मुख्यालयात आयजी सुखचैनसिंग गिल म्हणाले, पपलप्रीतच्या विरुद्ध आधीपासूनच ६ गुन्हे दाखल आहेत. १८ मार्च रोजी फरार झाल्यानंतर पपलप्रीत ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपालसोबत सावलीप्रमाणे राहत होता. ते दोघे सोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते.
कोण आहे अमृतपालच्या जवळचा पपलप्रीत?
पपलप्रीत हा अमृतसरच्या मजिठा हल्केमधील मरडी कला गावचा रहिवासी आहे. त्याची आई शिक्षिका होती आणि वडील शेती करतात. वारिस दे पंजाबमध्ये सामील होण्यापूर्वी २०१७ मध्ये पपलप्रीतने खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या सिमरनजितसिंह मान यांच्या पक्षात प्रवेश केला. याशिवाय तो आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे सातत्याने खलिस्तान चळवळ पुढे नेत होता. पंजाबमध्ये अकाली दल सरकारच्या काळात २०१५ मध्ये सरबत खालसा बोलण्यात आला होता. पपलप्रीत याच्या आयोजकांपैकी एक होता. चौकशीत पोलिसांनी पपलप्रीतवर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.