आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khalistan Commando Force | Paramjit Singh Panjwar| Lahore Pakistan | UAPA Terrorist Indian Government

खात्मा:पाकमध्ये खलिस्तानी अतिरेकी परमजीत सिंग पंजवडची हत्या; दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी परमजीत सिंग पंजवडची हत्या केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. - फाइल फोटो - Divya Marathi
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी परमजीत सिंग पंजवडची हत्या केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. - फाइल फोटो

खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) नामक अतिरेकी संघटनेचा म्होरक्या परमजीत सिंग पंजवड याची शनिवारी पाकच्या लाहोरमध्ये हत्या करण्यात आली. त्याला जौहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीत शिरून गोळ्या घालण्यात आल्या. त्यात पंजवडचा जागीच मृत्यू झाला. पंजवड 1990 पासून पाकिस्तानात लपून बसला होता. तिथे तो मलिक सरदार सिंग नावाने ओळखला जात होता.

यासंबंधीच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6 वाजता दुचाकीवरुन आलेल्या 2 हल्लेखोरांनी हल्ला केला व त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

पंजवड केंद्राच्या अतिरेक्यांच्या यादीत

परमजीत सिंग पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील झब्बल गावचा होता. तो पूर्वी सोहल येथील केंद्रीय सहकारी बँकेत नोकरी करत होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2020 मध्ये 9 अतिरेक्यांची एक यादी जारी केली होती. त्यात परमजीत सिंग 8 व्या क्रमांकावर होता. या यादीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) प्रमुख वाधवा सिंग बब्बरचेही नाव होते. बब्बर तरनतारनच्या दासुवाल गावचा आहे. पंजवड 90 च्या दशकापासून पाकमध्ये आश्रयास आहे.

पोलिसांकडे लेटेस्ट फोटोही नाही

पाकिस्तानात गत 33 वर्षांपासून परमजीत सिंगचे नाव मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत आहे. पण त्यानंतरही पंजाब पोलिसांकडे त्याचा कोणताही नवा फोटो नाही. पोलिसांकडे त्याचा एक 35 वर्ष जुना फोटो आहे. तो त्याच्या घरातून जप्त करण्यात आला होता.

ड्रग्ज व शस्त्रास्त्रांची तस्करी

परमजीत पंजाबमध्ये ड्रोनद्वारे अंमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. 1986 मध्ये त्याचा चुलत भाऊ लाभ सिंग अतिरेकी झाल्यानंतर तो खलिस्तान कमांडो फोर्समध्ये (KCF) सामील झाला.

भारतीय सुरक्षा दलाने लाभ सिंगचा खात्मा केल्यानंतर, पंजवडने 1990 च्या दशकात केसीएफची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. त्याला तिथे आश्रय मिळाला. मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत तो सर्वात वरच्या स्थानी होता. सीमापार शस्त्रास्त्रांची तस्करी व हेरॉइन तस्करीच्या माध्यमातून निधी उभारून त्याने केसीएफला जिवंत ठेवले. त्याची पत्नी व मुले जर्मनीत राहतात.

2020 मध्ये शौर्य चक्र विजेता बलविंदर सिंग संधूची हत्या

ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात शौर्य चक्र विजेते बलविंदर सिंग संधू यांची हत्या झाली होती. त्यामागे परमजीत सिंग पंजवडचा हात होता. बलविंदर सिंग संधू यांना पंजाबमधील दहशतवादाविरोधात मोहीम छेडली होती. त्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मान करण्यात आला होता. पंजवड तेव्हापासूनच बलविंदर सिंग यांच्या हत्येचा कट रचत होता.

1999 मध्ये चंदीगडमध्ये केला होता बॉम्बस्फोट

30 जून 1999 रोजी खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंग पंजवाडने चंदीगडमधील पासपोर्ट कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट केला होता. त्यात 4 जण जखमी झाले होते. तसेच अनेक वाहनांचेही नुकसान झाले होते. या स्फोटासाठी स्कूटरच्या डिक्कीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. स्कूटरवर पानिपतची (हरियाणा) नंबर प्लेट होती. त्यानंतर पोलिसांनी स्कूटर मालक शेर सिंगला पानिपत येथून अटक केली.

आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...