आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Paresh Rawal Apologises | Statement On Bengalis | Gujarat Election Bjp Campaign

बंगालींवरच्या वक्तव्यानंतर परेश रावल यांनी मागितली माफी:म्हणाले होते- स्वस्त गॅस सिलिंडरचे काय करणार, बंगालींसाठी मासे शिजवालं?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलसाडमध्ये दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेते परेश रावल यांना माफी मागावी लागली आहे. आपले विधान हे बंगाली म्हणजे बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यासंदर्भात होते. माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, असे ते म्हणाले.

वास्तविक, माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल हे गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. यावेळी गुजरातच्या वलसाडमध्ये सभेला संबोधित करताना परेश रावल यांनी रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख केला. त्यावरून वाद सुरू झाला आहे.

महागडे गॅस सिलेंडरची मागणी आणि रोजगाराबाबत सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देताना ते म्हणाले होते की, गॅस सिलिंडर महाग आहेत. पण स्वस्त होतील. लोकांना रोजगारही मिळेल. पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागतील. तेव्हा काय होईल. दिल्लीत असे होत आहे. मग तुम्ही गॅस सिलिंडर खरेदी करू शकता. तेव्हा तुम्ही काय कराल? बंगालींसाठी मासे शिजवालं? गुजरातमधील लोक महागाई सहन करतील, परंतु शेजारील बांगलादेशी आणि रोहिंग्यांना नाही.

परेश रावल यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परेश रावल यांच्यावर बंगाली आणि बांगलादेशी लोकांविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप अनेकांनी केला. वाद वाढत असल्याने त्यांनी माफी मागितली. एका युजरच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले की, "अर्थात मासे हा मुद्दा नाही. कारण गुजराती देखील मासे शिजवतात आणि खातात. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की बंगाली म्हणजे अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याविषयी मी बोललो. पण तरीही मी तुमच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो.

तोंडावर डायपर घालणे आवश्यक
अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना परेश म्हणाले- "ते इथे खाजगी विमानाने येतात. मग रिक्षात बसून दाखवतात. आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य अभिनयात घालवले आहे, पण अशी नौटंकी कधी पाहिली नाही. त्यांनी हिंदूंना खूप शिव्या दिल्या आणि शाहीन बागेत बिर्याणी वाढली होती. गुजरातचे लोक महागाई सहन करू शकतात पण हे नाही. ते ज्या प्रकारे शिवीगाळ करतात. त्यांच्यापैकी एकाने तोंडावर डायपर घालणे आवश्यक आहे.

खरगेंनी PM मोदींना दिली रावणाची उपमा

गुजरात निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वक्तव्य केले. अहमदाबादमध्ये जाहीर सभेत खरगे म्हणाले की, मोदींची रावणासारखी 100 तोंडे आहेत का? मला कळत नाही. रविवारी सुरतमधील जाहीर सभेत खरगे यांनी स्वत:ला अस्पृश्य म्हटले आणि पंतप्रधान मोदी हे खोटे बोलणारे नेते ठरवले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुजरात निवडणुक; पहिल्या टप्प्यात 57% मतदानाचा अंदाज

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाले. मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. दुपारी 12 नंतर काही प्रमाणात मतदानात वाढ झाली. परंतु, अंदाजानुसार मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. सायंकाळी 5 वाजता मतदान केंद्रे बंद झाली, मात्र कॅम्पसमध्ये मतदारांचे मतदान सुरूच होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे किल्क करा.

बातम्या आणखी आहेत...