आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. CCPA ने 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान उर्वरित टप्पा घ्यावा अशी शिफारस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका काही दिवसांवरच ठेपल्या आहेत. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार? याकडे लक्ष लागून आहे.
अधिवेशन दोन टप्प्यात
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर देखील कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.