आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Budget Session 2023; Rahul Gandhi Vs Bjp | Adani Hindenburg Case | Rahul Gandhi

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले:राज्यसभा-लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब, विरोधकांनी काढली तिरंगा यात्रा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला. - Divya Marathi
काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तीव्र गदारोळ झाला. यामुळे राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वात विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.

अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी करण्याच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या काँग्रेसने इतर 12 पक्षांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सायंकाळी ठेवलेल्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे.

विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.
विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.

एक दिवसही झाले नाही कामकाज

मागील 14 बैठकांपासून दोन्ही सभागृहांत अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीसह राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्यावर तीव्र गदारोळ झाला. भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या लंडनमधील विधानाप्रकरणी गदारोळ केला. पण राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यापासून भाजप शांत आहे. या गदारोळामुळे संसदेत एकही दिवस कामकाज झाले नाही.

रिजीजू म्हणाले - काँग्रेसने सभागृहाचा अवमान

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू म्हणाले की, आज पुन्हा काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात गदारोळ केला. त्यांनी आज पुन्हा काळे कपडे घालून सभागृहाचा अवमान केला. देश काँग्रेसचे कृत्य पाहत आहे. काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही, तसेच हा जुना पक्ष कायद्याचाही सन्मान करत नाही.

खरगे म्हणाले - अदानींची संपत्ती अडीच वर्षात एवढी कशी वाढली?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, अदानी प्रकरणी आम्हाला जेपीसी चौकशी हवी आहे. पण सरकार त्याला तयार नाही. ते घाबरते. अखेर अदानींची संपत्ती अवघ्या अडीच वर्षांत 12 लाख कोटींची कशी झाली? मोदीजी एकाच व्यक्तीला एवढ्या गोष्टी का देत आहेत?

संसदेत या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही अनेकदा नोटीस दिली. पण आमची मुस्कटदाबी करण्यात आली. असे प्रथमच झाले. मी 52 वर्षांत असे केव्हाच पाहिले नाही. सत्ताधारी पक्षाचे सदस्य गत 2 वर्षांपासून सभागृहाचे कामकाज चालू देत नाहीत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी संबंधित खालील बातमी वाचा...

संसद अधिवेशन:संसदेची दोन्ही सभागृहे बुधवारपर्यंत तहकूब, खरगे म्हणाले- राहुलसाठी मी माझा बंगला रिकामा करीन

संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी 11व्या दिवशीही प्रचंड गदारोळ झाला. दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झालेले राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज घोषणाबाजीत बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

रमा देवी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी 'लोकशाही वाचवा'चे पोस्टर फडकवण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान काही खासदारांनी ‘मोदी जी शर्म करो’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर लोकसभेचे कामकाज बुधवार, 29 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...