आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेतला गोंधळाचा VIDEO:राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की, सरकार म्हणाले - विरोधकांची वृत्ती धमकीसारखी, त्यांनी देशाची माफी मागावी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरुन देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यसभेतील या गोंधळाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या प्रकरणावरुन केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले की, विरोधकांनी कामात अडथळा आणण्याचे काम केले आणि यासाठी त्यांनी देशाची माफी मागावी.

खासदार आणि मार्शल दरम्यान धक्काबुक्की

या व्हिडीओमध्ये विरोधी खासदार आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहे आणि या दरम्यान त्यांना आवर घालण्यासाठी मार्शलला बोलावण्यात आले. खासदार आणि मार्शल यांच्यातील संघर्ष यामध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही खासदार टेबलावर चढताना दिसत आहेत. काही महिला खासदारांनाही धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...