आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:2022 पर्यंत तयार होईल संसद भवन : 1200 पट खर्च, मात्र एक तृतीयांश वेळेत उभारणी, 484 सीट्स जास्त असतील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी 10 डिसेंबरला करणार भूमिपूजन, 21 महिन्यांत इमारत उभी राहणार

देशाला २१ महिन्यांनंतर म्हणजे २०२२ पर्यंत नवीन संसद भवन मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० डिसेंबरला दुपारी १ वाजता नव्या संसद भवन परिसराचे भूमिपूजन करतील. नव्या भवनाच्या बांधकामासाठी सुमारे ९७१ कोटी रुपये खर्च येईल. सध्याच्या संसद भवनाची पायाभरणी १२ फेब्रुवारी १९२१ रोजी करण्यात आली होती. इंग्रजांनी १९२७ पर्यंत बांधकाम पूर्ण केले. सहा वर्षांत तयार झालेल्या संसदेच्या बांधकामावर ८३ लाख रुपये खर्च झाले होते. १८ जानेवारी १९२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन यांनी त्याचे उद्घाटन केले होते. नवीन संसद भवन जुन्या संसद भवनाच्या तुलनेत एक तृतीयांश वेळेत तयार होईल, मात्र खर्च जवळपास १२०० पट येईल.

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यानुसार नव्या भवनात खासदारांसाठी लाउंज, वाचनालय, समिती कक्ष आणि भोजन कक्षही असतील. संसदेला पेपरलेस करण्यासाठी डिजिटल सुविधाही असतील. नव्या इमारतीत ८८८ लोकसभा आणि ३८४ राज्यसभा सदस्यांना बसता येईल. सध्याच्या भवनात ५४३ लोकसभा आणि २४५ राज्यसभा सदस्यांना बसण्याची व्यवस्था आहे. हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताचे उदाहरण असेल. ते पूर्णपणे भारतीय नागरिक तयार करतील. त्याच्या बांधकामात २००० जण प्रत्यक्ष आणि ९००० अप्रत्यक्षपणे सहभागी असतील.

वैशिष्ट्ये
- खासदारांची बैठक व्यवस्था जास्त आरामदायी असेल. टू सीटर बेंच असेल, म्हणजे एक टेबलवर दोन खासदार बसतील.
- नवे भवन ६५ हजार चौरस मीटरमध्ये असेल. १६,९२१ चौ. मी. अंडरग्राउंड असेल.
- नव्या भवनाचे बांधकाम टाटा समूह करेल.
- नव्या इमारतीची उंची सध्याच्या भवनाइतकीच.
- भूकंपविरोधी इमारत त्रिकोणी असेल. आकाशातून तीन रंगांची किरणे दिसतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser