आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament LIVE Update 8 Feb; Rajya Sabha Lok Sabha Latest News | Farmers Protest (Kisan Andolan) Farm Bill Latest News And Updates

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांकडून आभार:नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना अपील- आंदोलन मागे घ्या, आपण सोबत मिळून चर्चा करू

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है।'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मोदी म्हणाले की, आदरणीय सभापती महोदय, संपूर्ण जग आव्हानांना सामोरे जात आहे. अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल, असा विचारदेखील कुणी केला नसेल. या दशकाच्या सुरूवातीस, राष्ट्रपतींनी संयुक्त सभागृहात जे भाषण केले, ते नवीन आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. हे भाषण म्हणजे आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवणारे आणि या दशकासाठी मार्ग प्रशस्त करणे.'

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'राज्यसभेत सुमारे 13-14 तास खासदारांनी त्यांचे मौल्यवान मत मांडले आणि अनेक बाबींवर प्रकाश टाकला. सर्वांचे आभार व्यक्त करतो. परंतु, सर्वांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले असते तर लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती. राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी होती, बरेच लोक ऐकत नसतानाही बोलू शकले. त्यातून, भाषणाचे मूल्यांकन केले जाऊ शकते.'

कवितेतून विरोधकांना टीका

मोदी पुढे म्हणाले की, आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या काळात काहीतरी नवीन केले पाहिजे. येणाऱ्या काळात स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी आपण कुठे असावे, याबाबत आपल्याला आताच विचार करायला हवा. आज संपूर्ण जगाचे लक्ष्य़ आपल्यावर आहे. जेव्हा मी येणाऱ्या संधीबद्दलबोलत आहे, तेव्हा मला मैथिलीशरण गुप्त यांची कविता आठवते. ते म्हणतात, 'अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है। तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल।'

शेतकरी संघटनांना अपील-आंदोलन मागे घ्या, सोबत मिळून चर्चा करू

यावेळी मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अपील केली की, आंदोलनस्थळी वृद्ध लोकही बसले आहेत. त्यांचाही विचार करा आणि आंदोलन संपवा. आपण सोबत मिळून चर्चा करू आणि मार्ग काढू. काही सुधारणा करण्यासाठी आम्हाला संधी द्या. याशिवाय मोदी म्हणाले की, सभागृहाची पवित्रता समजून घ्या. ज्या 80 कोटी लोकांना स्वस्त धान्य मिळते, ते सुरूच राहील. लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी होत आहे. आपल्याला असे काही करायचे आहे की, शेतकऱ्यांवर सर्व भार पडता कामा नये. आपण, राजकारणात अडकलोत, तर काहीच होणार नाही.

शेतकरी आंदोलनावर मोदी म्हणाले...

शेतकरी आंदोलनावर खूर चर्चा झाली. पण, मुळ विषयावर चर्चा झाली असती, तर चांगले झाले असते. कृषी मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले, पण त्याचे उत्तर मिळालेच नाही. देवेगौडा यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अखेर शेतीची समस्या आहे तरी काय ? मी चौधरी चरण सिंह यांच्या हवाल्याने सांगू इच्छितो की, त्यांनी 1971 मध्ये म्हटले होते- 33% शेतकरी अल्पभूधारक आहेत. 18% शेतकऱ्यांकडे 2 ते 4 एकर जमीन आहे. 51% शेतकरी शेतीवर जगू शकत नाही.

10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचले

मोदी पुढे म्हणाले की, फक्त निवडणुका आल्यावर कर्जमाफीची चर्चा होते. यामुळे लहान शेतकऱ्यांचा फायदा होत नाही, कारण त्यांचे बँकेत खातेही नसते. आधीची विमा योजना फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी होते. सिंचनाची सुविधा मोठ्या शेतकऱ्यांसाठी होती. लहान शेतकऱ्यांना फक्त हाल आपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. पण, आम्ही 2014 मध्ये विमा योजनेची व्याप्ती वाढवली. मागील 4-5 वर्षात शेतकऱ्यांना 90 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही क्रेडिट कार्ड देत आहोत. 'प्रधानमंत्री सम्मान निधि' योजने अंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांचा खात्यात पैसे जात आहेत. बंगालचे शेतकरी यात आले असते, तर आकडा अजून वाढला असता.

जग आपल्या प्रयत्नांना दाद देत आहे

ते म्हणाले की कोरोनादरम्यान कोणालाही मदत करणे कठीण होते. एक देश दुसर्‍या देशाला, एक राज्य दुसर्‍या राज्याला, एका कुटुंब दुसर्‍या कुटुंबाला मदत करू शकत नव्हते. कोट्यावधी लोक मरणार, असे म्हटले जात होते. एक अनोळखी शत्रू काय करू शकतो, याची कल्पनाही कुणाला नव्हती. याचा सामना कसा करावा, हेदेखील आपल्याला माहित नव्हते. आपल्यला मार्ग शोधायचे होते आणि लोकांचे प्राण वाचवायचे होते. देवाने जी बुद्धी आपल्याला दिली, त्याच्या मदतीने लोकांना वाचवण्यात यश आले. लोक याची दाद देत आहेत.

देशाचे मनोबल मोडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नका

मोदी पुढे म्हणाले की, सोशल मीडियामध्ये तुम्ही पाहिले असेल, फुटपाथवर बसलेली वृद्ध आई दिवा लावत होती. काही जम त्याची थट्टा करत होते. जे कधीच शाळेत गेले नाहीत, त्यांनी देशातील सामूहिक शक्तीची ओळख जगाला करुन दिली. परंतु काही जणांनी त्या सर्वांची चेष्टा केली. विरोध करण्यासाठी अनेक मुद्दे असतात. पण, तुम्ही देशाला तोडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नका. आमचे कोरोना वॉरियर्स, ज्यांनी कठीण काळात जबाबदारी घेतली, त्यांचा आदर केला पाहिजे. असे देशाने दाखवून दिले.

कोरोना लसीचा उल्लेख

मोदी पुढे म्हणाले की, ज्या देशाचा जगात तिसरा नंबर लागतो, त्या देशाने सर्वात आधी व्हॅक्सीन आणल्यामुळे जगभरात कौतुक झाले. जगातील सर्वात मोठे लसीकरण आपल्या देशात सुरू आहे. आज कोरोनाने जगासोबत आपल्या नात्याला नवीन ओळख दिली. भारताने 150 पेक्षा जास्त देशात कोरोना व्हॅक्सीन पाठवली. कोरोनासारख्या कठीण काळात देश आणि राज्याने कसे काम करावे, हे देशाने दाखवून दिले. मी सर्वांचे आभार मानतो.

बंगालचा उल्लेख करायला विसरले नाहीत मोदी

मोदींनी यावेळी बंगालचादेखील उल्लेख केला. ते म्हणाले की, प्राचीन भारतात 181 गणतंत्रांचे वर्णन आहे. भारताचा राष्ट्रवाद संकुचित, स्वार्थी किंवा आक्रमक नाही. हा सत्यम, शिवम, सुंदरमवरुन प्रेरित आहे. हे शब्द नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे आहेत. आपण कळत-न कळत नेताजींच्या भावना, त्यांचे विचार, आदर्शांना विसरलो आहोत. आपण आपल्या तरुण पिढीला सांगितलेच नाही की, या देशात लोकशाहीचा उदय झाला. हे बाब आपल्याला गर्वाने सांगावी लागेल. भारताच्या शासन व्यवस्थेमुळे आपण लोकशाहीचे पालन करत नाही, मुळात इथे लोकशाही होती, म्हणूनच आपण अशी व्यवस्ता आहे. इमरजंसीच्या वेळेस प्रत्येक संस्था तुरुंगात होती, पण लोकशाही काम राहिली.

काँग्रेसचा व्हिप

काँग्रेसने रविवारी सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार मानण्यासाठी राज्यसभेत 25 पक्षातील 50 नेत्यांनी भाग घेतला होता. यात भाजपचे 18, काँग्रेसचे 7 आणि इतर पक्षांचे 25 खासदार सामील झाले. या सर्वांसाठी 15 तासांचा वेळ देण्यात आला होता. सुरुवातीला विरोधी पक्षांना नवीन कृषी कायद्यांवर स्वतंत्रपणे वादविवाद हवे होते, परंतु नंतर त्यांनी आभार प्रस्तावावरील चर्चेत याला समाविष्ट करण्याचे मान्य केले.

कारवाईदरम्यान गोंधळ सुरूच होता

बजेट सत्राच्या कारवाईदरम्यान आतापर्यंत गोंधळच झाला. विरोधक सतत सत्ताधाऱ्यांना कृषी कायद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत होते. एक वेळ तर अशी आली की, उपराष्ट्रपती आणि सभापती वैंकया नायडून यांना विरोधकांना म्हणावे लागले, चुकीचे उदाहरण देऊ नका. लोकांची दिशाभूल करू नका आणि कृषी कायद्यावर चर्चा झालीच नाही, असे म्हणू नका. मतदान झाले होते आणि सर्व पक्षांनी आपली बाजू मांडली होती.

बातम्या आणखी आहेत...