आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Live Updates; Nirmala Sitharaman Prakash Javadekar | Rajya Sabha Lok Sabha Latest News |Sachin Waze Mukesh Ambani Antilia Case Latest News And Updates

अँटीलिया प्रकरणी संसदेत गदारोळ:उद्धव ठाकरे यांनीच निलंबित सचिन वाझेंना पोलिस विभागात परत घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्र्यांची एका API कडून 6000 कोटींची वसुली: पूनम महाजन

अँटीलिया प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे. यातच मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे प्रकरणाला अजून हवा मिळाली. आता या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटायला सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी अँटीलिया प्रकरण संसदेत मांडले. सोमवारी दोन्ही सभागृहात या प्रकरणावरुन जोरदार गोंधळ झाला. यावेळी गोंधळ वाढल्यानंतर शिवसेना खासदारांनी सभागृहातून वॉक आउट केला.

यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी राज्यसभेत हे प्रकरण मांडले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री वसूली करत आहेत आणि हे सर्व देश पाहत आहे. पण, लोकसभा अध्यक्षांनी याला रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश दिले.

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

अँटीलिया प्रकरणावर बोलताना खासदार नवनीत रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर सचिन वाझेंची पाठराखण करण्याचा आरोप लावला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंना पोलिस सेवेत परत घेण्याची मागणी केली होती. 16 वर्षांपासून निलंबित असलेल्या व्यक्तीला परत घेण्याची मागणी उद्धव ठाकरे कशामुळे करत होते. त्यांना याचे खरे कारण सांगावे लागेल.

गृहमंत्र्यांची एका API कडून 6000 कोटींची वसुली: पूनम महाजन

या प्रकरणावर बोलताना भाजप खासदार पुनम महाजन म्हणाल्या की, महाराष्ट्रात तीन पायांचे सरकार आहे. कोणचाच कोणाशी ताळमेळ नाही. एका DG लेव्हलवरील IPS अधिकारी प्रश्न उपस्थित करतात की, महाराष्ट्रात एका API ला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले जाते. महिन्याला 100 कोटी म्हणजे, वर्षाला 1200 कोटी. म्हणजेच, एका API कडून पाच वर्षात 6000 कोटी रुपयांचे टार्गेट होते. हा आकडा फक्त एका पोलिसाकडून आहे. गृहमंत्र्यांनी अशा किती पोलिसांना वसुलीचे आदेश दिले होते, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...