आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे पावसाळी अधिवेशन:लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब, राज्यसभेत गोंधळ करणाऱ्या खासदारांवर कारवाईची शक्यता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळावर बोलताना राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू भावनिक झाले. ते म्हणाले की, विरोधक सरकारवर सक्ती करू शकत नाहीत. काल जे काही घडले ते लोकशाहीच्या विरोधात आहे.

उच्च सभागृहात गोंधळ निर्माण करणाऱ्या खासदारांवर कारवाई होऊ शकते. काल विरोधी पक्षांचे नेते वेलमध्ये पोहोचले आणि डेस्कवर चढून रुल बुक अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने फेकले. मात्र, सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर हे घडले होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी कनिष्ठ सभागृह तहकूब करण्यात आले आहे. सभागृहात सतत होणारा गोंधळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर विरोधी नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजी लक्षात घेता राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षांची बैठक झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात ही बैठक झाली. या दरम्यान, सभागृहात आजच्या कामकाजाविषयी विरोधी धोरण तयार केले गेले.

ओबीसींची यादी करण्याचे अधिकार देणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. त्याच्या बाजूने 385 मते मिळाली, तर विरोधी पक्षात एकही मत मिळाले नाही. राज्यसभेत आज विधेयक मांडले जाऊ शकते. असे मानले जात आहे की, येथेही हे विधेयक सहजपणे पास होईल.

बातम्या आणखी आहेत...