आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Bills 2021 Update; Kisan Andolan And Pegasus Phone Tapping; News And Live Updates

पेगाससवरुन संसदेत गदारोळ:राज्यसभा अडीच वाजेपर्यंत तहकूब, 16 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन सरकारला घेराव घालण्याची आखली रणनीती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते.

देशात गेल्या काही दिवसापासून संसदचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरुन विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाम आज दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले आहे. यापूर्वी पहिल्यांदा राज्यसभा 12 वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते.

विरोधी पक्षांनी आखली रणनीती
तर दुसरीकडे, 16 विरोधी पक्षांनी बैठक घेत दोन्ही सभागृहात सरकारला घेराव घालण्याची रणनीती आखली आहे. दरम्यान, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

राज्यसभेचे हे नेते होते उपस्थित होते
मल्लिकार्जुन खरगे, आनंद शर्मा, जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल (काँग्रेस), सुखेंदू शेखर रॉय (टीएमसी), तिरुची शिवा आणि आरएस भारती (डीएमके), ई करीम (सीपीएम), विशांबर निषाद (सपा), वंदना चव्हाण आणि फौजिया खान (राष्ट्रवादी), विनय विश्वाम (भाकप), संजय राऊत (शिवसेना), एम.व्ही. श्रेयांश कुमार (एलजेडी), श्री वायको (एमडीएमके).

लोकसभेचे हे नेते होते उपस्थित
अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, सुरेश कोडिकुनिल, माणिक टागोर (काँग्रेस), टीआर बाळू (द्रमुक), हुसेन मसूदी (राष्ट्रीय परिषद), ए एम आरिफ (सीपीएम), ए शमसुद्दीन (आययूएमएल), एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), थॉमस जी (केरळ काँग्रेस-एम), डी रविकुमार (व्हीसीके), सौगत रॉय (टीएमसी), श्यामसिंह यादव (बसपा)

बातम्या आणखी आहेत...