आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Parliament Monsoon Session Bills 2021 Update; Kisan Andolan, Petrol Price Hike And Pegasus Phone Tapping; News And Live Updates

​​​​​​​संसदेचे पावसाळी अधिवेशन:14 पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले - हेरगिरी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर तडजोड नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सरकार विरोधी पक्षाची बदनामी करत आहे - राहुल गांधी

पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांचा संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. बुधवारी राज्यसभेच्या कामाकाजादरम्यान विरोधी पक्षाने जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. दरम्यान, विरोधी पक्षांनी महत्त्वपूर्ण बैठक घेत सरकारला घेराव घालण्याची योजना आखली.

बैठकीनंतर काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी म्हणाले की, आम्ही पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड करणार नाही. आम्हाला या विषयावरुन संसदेत चर्चा करायची असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सरकार विरोधी पक्षाची बदनामी करत आहे - राहुल गांधी
बैठकीदरम्यान, राहुल गांधी म्हणाले की आम्ही दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देत नसल्याचे सांगून सरकार विरोधी पक्षाची बदनामी करीत आहे. आम्ही शेतकरी, जनता आणि देशाशी संबंधित मुद्दे सभागृहात मांडत आहोत. यामुळे संसेदच्या दोन्ही सभागृहात गोंधळ निर्माण झाला आहे.

काही प्रश्न असे स्पायवेअर खरेदीचा अधिकार कोणत्या मंत्रालयास दिला? हेरगिरी कोणत्या कारणांमुळे झाली?

 • सरकारने सुरक्षा कारणांमुळे परदेशी कंंपन्यांकडून हेरगिरी सॉफ्टवेअरची खरेदी केली. उत्तर होकारार्थी असल्यास कोणकोणत्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे? ते कोठून खरेदी करण्यात आले?
 • सरकारने इस्रायली कंपनीकडून पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केले का?
 • पेगासस खरेदीची प्रक्रिया ग्लोबल टेंडरद्वारे करण्यात आली. तसे असल्यास त्यात कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होता?
 • पेगासस सॉफ्टवेअर कोणत्या मंत्रालयाने खरेदी केले?
 • स्पायवेअरचा वापर करण्यासाठी कोणते मंत्रालय अधिकृत करण्यात आले आहे?
 • विरोधी नेते, मंत्री, पत्रकार व इतर व्यक्तींच्या विरोधात पेगाससचा वापर सरकारच्या पातळीवर झाल्यास कोणत्या कारणांनी हे पाऊल उचलले?

विरोधकांकडून नाकेबंदी

 • काँग्रेसची टीम : अध्यक्ष शशी थरूर, कार्ती चिदंबरम, शक्तीसिंह गोहिल, सय्यद नासिर हुसेन.
 • घेरण्यासाठी साथ : जयदेव गल्ला (टीडीपी), धैर्यशील माने (शिवसेना), महुआ मोइत्रा (तृणमूल), नदीमुल हक (तृणमूल), पीआर नटराजन (माकप).
 • तटस्थ : भाजपला मूक पाठिंबा : सुमनलता अंबरीश (अपक्ष), नरेंद्र जाधव, सुरेश गोपी.
बातम्या आणखी आहेत...