आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Bills 2021 Update; Rahul Gandhi Narendra Modi | Kisan Andolan, Pegasus Snooping Row

मोदी-शहांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी:पेगासस प्रकरणी संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांची घोषणाबाजी, राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळी अधिवेशनात आजही पेगासस हेरगिरी प्रकरणी गदारोळ सुरूच आहे. राज्यसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली. याच गदारोळात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेत सुद्धा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अशात कनिष्ठ सभागृहाचे कामकाज सुद्धा आधी 11.45 वाजेपर्यंत आणि नंतर 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 12 वाजता कामकाजा सुरुवात होणार तेवढ्यात विरोधी पक्षाच्या खासदारांनी ठिय्या मांडला. यानंतर लोकसभेचे कामकाज 12.30 वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. तत्पूर्वी सोमवारी सुद्धा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी पेगाससचा मुद्दा उचलून धरला. काँग्रेस खासदार मनिका टागोर यांनी लोकसभा स्थगनाचा प्रस्ताव मांडला. दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

मोदी, अमित शहांनी पेगाससवर संसदेत चर्चा करावी
देशभरातील काही पत्रकार, राजकारणी आणि इतर महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात आहे. यासाठी इस्रायली स्पायवेअर पेगाससचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, हे सॉफ्टवेअर इस्रायलकडून केवळ सरकारांनाच विकल्या जाते. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृ,हमंत्री अमित शहा यांनी संसदेत हजर राहावे आणि त्यांच्या हजेरीतच या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. पावसाळी अधिवेशनाचा एक आठवडा अशाच गोंधळात निघून गेला. आता दुसरा आठवडा सुद्धा वादळी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

चर्चेविना दोन विधेयकांना मंजुरी

दरम्यान, सोमवारी लोकसभेत गदारोळातच सरकारने फॅक्‍ट्रिंग नियमन (संशोधन) विधेयक 2021 आणि राष्‍ट्रीय खाद्य कंपनी, उद्योजक आणि व्यवस्थापन विधेयक 2021 मंजूर करून घेतले. या दोन्ही विधेयकांवर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यांना आवाजी मतदानातून मंजुरी देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फॅक्‍ट्रिंग नियमन संशोधन विधेयक सादर करताना म्हटले होते, की सूक्ष्‍म, लघु आणि मध्‍यम उद्योग क्षेत्राच्या हितासाठी काही बदल करण्यात आले आहेत. यात फॅक्‍ट्रिंग उद्योगाची व्याख्या सामान्य करण्यात आली आहे. यात बँका, बिगर-बँकिंग वित्तीय संस्था आणि इतर व्यावसायिक संस्थांना समाविष्ट करण्यात आले.

या आठवड्यातील यादीत 5 अध्‍यादेश
लोकसभा आणि राज्‍यसभेत जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, या आठवड्यात 5 अध्यादेश यादीत आहेत. यामध्ये होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल (संशोधन) अध्‍यादेश, द इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल (संशोधन) अध्‍यादेश, एनसीआरमध्ये हवेचा दर्जा व्यवस्थापन करण्याबाबतचे अध्यादेश, द इनसॉल्‍वेंसी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) अध्‍यादेश आणि द एजेंशियल डिफेंस सर्विसेज अध्‍यादेश इत्यादींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...