आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session; Dainik Bhaskar IT Raids Update | Rajya Sabha Adjourned As Dainik Bhaskar's Bhopal Gujarat Rajasthan Offices Raided By Income Tax Officials

दैनिक भास्करवरील छाप्याचे संसदेत पडसाद:लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी केला छाप्याचा विरोध, ममता म्हणाल्या - भास्करने मोदी सरकारचा निष्काळजीपणा निर्भीडपणे दाखवला

भोपाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस म्हणाले - निर्भीडपणे सत्य मांडणाऱ्या मीडिया समूहाला दाबण्याचा प्रयत्न

दैनिक भास्कर समूहावर सरकारी छापेमारीचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. भास्कर समूहाच्या कार्यलयांवर पडलेल्या धाडींचा राज्यसभेत जोरदार विरोध करण्यात आला आहे. या धाडींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत सुद्धा याचे पडसाद दिसून आले. या ठिकाणी सुद्धा फोन टॅपिंग, हेरगिरी आणि छापेमारीच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. यानंतर कारवाई सुरू झाली, मात्र प्रचंड गदारोळामुळे सभागृह उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकसभेतही गदारोळ झाला, येथे फोन टॅपिंग आणि हेरगिरीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यानंतर लोकसभेला चार वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार आणि मीडिया हाऊसवरील हल्ल्याला लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, कोरोना दरम्यान भास्करने निर्भयपणे मोदी सरकारचा निष्काळजीपणा दाखवला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान देशासमोर सरकारी गैरकारभाराचे वास्तव चित्र दर्शवणाऱ्या दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयांवर गुरुवारी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला. विभागाच्या टीम दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान येथील कार्यालयांमध्ये पोहोचल्या असून कारवाई सुरू आहे.

काँग्रेस म्हणाले - निर्भीडपणे सत्य मांडणाऱ्या मीडिया समूहाला दाबण्याचा प्रयत्न
भास्कर समूहावर छापा टाकल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, हा देशातील सत्यता धैर्याने उघडकीस आणणार्‍या माध्यम समूहाला दाबण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, छापे हे माध्यमांना धमकावण्याचा प्रयत्न आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मांडली होती सत्य परिस्थिती

उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून झालेल्या गैरव्यवस्थापनाची सत्य परिस्थिती दैनिक भास्कर समूहाने समोर आणण्याचा प्रयत्न केला. दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यललयांवर गुरुवारी पहाटेपासूनच आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. यात दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह राजस्थानच्या कार्यलयांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी छापेमारी करत आहेत.

भास्करच्या निर्भीड पत्रकारितेचे विरोधकांकडून कौतुक

भास्कर समूहावर दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तीव्र विरोध केला. देशाचे सत्य निर्भिडतेने समोर आणणाऱ्या माध्यम समूहाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे त्यांनी म्हटले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छापेमारी करून मीडियाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...