आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Live Updates Fourth Day Uproar TMC MP Shantanu Sen Suspension; News And Live Updates

पावसाळी अधिवेशन:संसदेत चौथ्या दिवशीही प्रचंड गदारोळ, लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब; कागदपत्रे फाडल्याप्रकरणी टीएमसी खासदाराचे निलंबन

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरदीप पुरी यांनी केली राज्यसभेत शिवीगाळ - शांतनु सेन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा आज चौथ्या दिवस आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांवरुन विरोधीपक्षांकडून जोरदार गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यसभेचे कामकाजदेखील दुपारी अडीचपर्यंत तहकूब केले आहे.

राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू म्हणाले की, सभागृहातील घडामोडींमुळे मी दु:खी आहे. दुर्दैवाने, सभागृहाच्या कामकाजादरम्यान आयटी मंत्र्यांकडून हे कागद हिसकावून घेत त्याला फाडण्यात आले. या कृत्यामुळे सभागृहाची कार्यवाही खालच्या स्तरावर गेली असून हा संसदीय लोकशाहीवरील स्पष्ट हल्ला असल्याचे नायडू यांनी सांगितले.

कागदपत्रे फाडल्याप्रकरणी टीएमसी खासदाराचे निलंबन
तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी कामकाजादरम्यान आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावत ते फाडले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सरकारने त्यांच्या निलंबनासाठी राज्यसभेत प्रस्ताव सादर केला होता. तृणमूल काँग्रेसची ही बंगालमधील हिंसाची संस्कृती असून ते आता सभागृहात आणू पाहत असा टोला वैष्णव यांनी लगावला आहे.

हरदीप पुरी यांनी केली राज्यसभेत शिवीगाळ - शांतनु सेन
राज्यसभेत कामकाजादरम्यान सभागृहातील नेते पीयूष गोयल आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांना आश्वासन दिले की, मंत्र्यांचे स्पष्टीकरण झाल्यावर आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ. परंतु, या सर्व गोष्टींचा काहीच उपयोग झाला नाही असे सेन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी राज्यसभेत शिवीगाळ केली असून मारहाणीसाठी अंगावर धावून आल्याचा आरोपही सेन यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...