आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Lok Sabha Rajya Sabha Ruckus Three Week Total Work Report; News And Live Updates

संसदेचे पावसाळी अधिवेशन:राज्यसभेत तिसऱ्या आठवड्यात 8 विधेयके झाली मंजूर; विरोधी पक्षांचा गदारोळ कायम, सभागृहाच्या कामकाजात 24 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चर्चेशिवाय विधेयक झाले मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होऊन तीन आठवडे होत आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांचा पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन गदारोळ कायम आहे. परंतु, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेत 8 विधेयके मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाज तासनतास तहकूब करावे लागत आहे. या आठवड्यात कामकाजामध्ये वाढ झाली असून 13.70% वरुन हे 24.20% आले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 32.20 टक्के काम पहिल्या आठवड्यात झाले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु झाले आहे. तिसऱ्या आठवड्यात गदारोळामुळे सभागृहाचे 21 तास 36 मिनीटे वाया गेली आहेत. राज्यसभेतील एका अधिकाऱ्याच्या मते, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात सभागृहात केवळ 22.60 टक्के काम झाले. ज्यामध्ये 8 विधेयके मंजूर करण्यात आली असून यासाठी 3 तास 25 मिनीट लागली आहे.

गदारोळामुळे 78.30 तासांपैकी 60.28 तास गेले वाया
विरोधी पक्षांच्या गदोराळामुळे संसदेचे अनेक तास वाया जात आहे. तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेच्या कामकाजासाठी निश्चित केलेल्या 28.30 तासांपैकी 1.41 तास काम झाले. विशेष म्हणजे सत्र सुरु झाल्यापासून सभागृहाचे एकूण 78.30 तासांपैकी 60.28 तास वाया गेले. तीन आठवड्यांत एकूण 17.44 तास काम झाले. राज्यसभेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकांवर 3.19 तास तर प्रश्नोत्तरावर 4.49 तास चर्चा झाली. दरम्यान, जागतिक महामारी असलेल्या कोरोनाशी संबंधित मुद्द्यांवर 4.37 तास चर्चा करण्यात आली.

चर्चेशिवाय विधेयक झाले मंजूर
दोन्ही सभागृहात सुरु असलेल्या गदारोळामुळे अनेक विधेयके चर्चेविना मंजूर झाली. हे निरोगी लोकशाहीसाठी चांगले नाही. सभागृहाच्या अध्यक्षांनीही वारंवार या सदस्यांना याची आठवण करुन दिली. परंतु, याचा काहीच परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी ही याचा विरोध केला होता.

या पक्षांचे सदस्य चर्चेत सामील
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये एआयएडीएमके, आम आदमी पार्टी, बिजू जनता दल (बीजेडी), भारतीय जनता पार्टी (भाजप), काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी (सीपीएम), द्रमुक, जनता दल युनायटेड JDU), काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी), राष्ट्रीय जनता दल (RJD), RPI, शिवसेना, तेलुगू देसम पार्टी (TDP), TMC, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि YSR काँग्रेसच्या राष्ट्रवादी सदस्यांचा समावेश आहे.

अधिवेशन 19 जुलैपासून झाले सुरु
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु झाले असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, संसदेचा जास्तीत जास्त वेळ हा गदारोळात गेल्याने प्रत्येक वेळी कामकाज तहकूब करावे लागले आहे. यामुळे संसदेच्या जवळपास अधिक तासाचे नुकसान झाले आहे. यामुळे करदात्यांचे 140 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे संसदेच्या एका मिनटाच्या कामकाजासाठी लाखो रुपये खर्च होतात.

बातम्या आणखी आहेत...