आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Lok Sabha Rajya Sabha Uproar Government Present Bills; News And Live Updates

संसदेचे पावसाळी अधिवेशन:कामकाज सुरु होताच सभागृहात जोरदार गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभा आज दुसऱ्यांदा करण्यात आली तहकूब; ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले राहुल गांधी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूला संसदेने केले अभिनंदन

संसदचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा उलटला तरी सभागृहात गोंधळ कायम आहेत. संसेदच्या दोन्ही सभागृहात एकही दिवस व्यवस्थित काम झाले नाही. विरोधी पक्ष पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि भास्कर समुहावरील छापेमारीवरुन सरकार हल्लाबोल करत आहे. दरम्यान, आज सोमवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवातही गोंधळापासून झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज दुपारी 2:45 वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विशेष म्हणजेच आज दुसऱ्यांदा या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेने जारी केलेल्या नोटिसांनुसार, केंद्र सरकारने या आठवड्यातील कामकाजासाठी पाच अध्यादेशांची यादी केली आहे. यामध्ये होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, भारतीय औषध केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि आवश्यक संरक्षण सेवा अध्यादेश यांचा समावेश आहे.

रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूला संसदेने केले अभिनंदन
कामाकाजाच्या सुरुवातील राजसभा सदस्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेने वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले हे तुम्हाला सांगताना मला खूप आंनद होत आहे. सभागृहाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, इतर खेळाडू देखील आपापल्या खेळात चांगली कामगिरी करतील आणि देशाचा नाव मोठे करतील असे ओम बिर्ला म्हणाले.

ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले आहे. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत जात असून सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...