आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Resume Third Week Updates Opposition Parties Pegasus Controversy; News And Live Updates

​​​​​​​संसदेचे पावसाळी अधिवेशन:​​​​​​​न्यायाधिकरण सुधारणा विधेयक लोकसभेत सादर; पेगासस हेरगिरी प्रकरणी सभागृहात विरोधकांचा गोंधळ कायम

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधूचे दोन्ही सभागृहात अभिनदंन

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन आठवडे उलटले तरी सभागृहात विरोधी पक्षांचे गोंधळ कायम आहे. विरोधी पक्ष पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईच्या मुद्यांवरुन आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज निर्धारित वेळेत होत नसल्याने करदात्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केले आहे.

लोकसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतचे लोकसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2021 सादर केले. हे विधेयक न्याय वितरण प्रणाली सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हे तयार केले गेले असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2021 आणि अंतर्देशीय जहाज विधेयक, 2021 यासह महत्त्वाच्या विधेयकांवर आज राज्यसभेत चर्चा होऊ शकते.

पी. व्ही. सिंधूचे दोन्ही सभागृहात अभिनदंन
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन करण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक पटकावले आहे. ती कोणत्याही वैयक्तिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तर दुसरीकडे, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनीदेखील पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे.

अधिवेशन 19 जुलैपासून झाले सुरु
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु झाले असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, संसदेचा जास्तीत जास्त वेळ हा गदारोळात गेल्याने प्रत्येक वेळी कामकाज तहकूब करावे लागले आहे. यामुळे संसदेच्या जवळपास 89 तासाचे नुकसान झाले आहे. 12 दिवसात संसद केवळ 18 तास चालली आहे. यामध्ये राज्यसभेचे कामकाज निर्धारित वेळेच्या 21 टक्के तर लोकसभेचे कामकाज 13 टक्के चालले आहे. लोकसभा 54 तासात केवळ तास तर राज्यसभा 53 तासात 11 तास चालली आहे.

विरोधी पक्ष हेरगिरी प्रकरणावर ठाम
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन विरोधी पक्ष सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. जोपर्यंत सरकार यावर चर्चा करत नाही, तोपर्यंत गदारोळ कायम राहणार असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही मागणी फेटाळून लावत ही मुळीच समस्या नसल्याचे लोकसभेत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...