आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Update; Parliament Monsoon Session, Parliament Session, Sonia Gandhi, Narendra Modi, BJP, Congress, NDA

पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसची टीम तयार:सोनिया गांधींनी पक्षाच्या नेतृत्त्वात बदल करण्यासाठी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना दिली महत्त्वाची जबाबदारी, अधीर रंजन लोकसभेत नेते कायम राहतील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राफेल आणि व्हॅक्सीनेशनवर सरकारला घेरणार काँग्रेस

कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षाच्या संसदीय गटात बदल केले आहेत. विशेष म्हणजे जी -23 लीडर्स, ज्यांनी गेल्या वर्षी कॉंग्रेस नेतृत्वाबद्दल पत्र लिहिले होते, त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यामध्ये मनीष तिवारी आणि शशी थरूर यांचीही नावे आहेत. बंगाल कॉंग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत कॉंग्रेसचे नेते बनवण्यात आले आहे.

यापूर्वी असे मानले जात होते की, अधीर रंजन चौधरींना लोकसभेत काँग्रेसच्या लीडरच्या पोस्टवरुन हटवले जाऊ शकते, कारण काँग्रेसला पावसाळी अधिवेशनात तृणमूलसोबतच चांगले फ्लोर कोऑर्डिनेशन हवे आहे.

काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा संसदीय गटांमध्ये बदल

  1. अधीर रंजन यांना पदावर कायम ठेवले गेले आहे. याव्यतिरिक्त दिवंगत काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोईंना लोकसभेत काँग्रेसचे डिप्टी लीडर बनवण्यात आले आहे.
  2. लोकसभेत काँग्रेसचे चीफ व्हिपची जबाबदारी के सुरेश सांभाळतील. रवनीत सिंह बिट्टू आणि मनीकाम टॅगोर पक्षाचे व्हिप असतील.
  3. राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे नेते असतील आणि त्यांच्या डिप्टीची जबाबदारी वरीष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा सांभाळतील.
  4. राज्यसभेत चीफ व्हिप जयराम रमेश असतील.
  5. मनीष तिवारी आणि शशी थरुर 7 सदस्यीय संसदीय दलाचा भाग असतील. या ग्रुपमध्ये अंबिका सोनी, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि केसी वेणुगोपाल यांचाही समावेश करण्यात आला आहे.

संसदीय दलाला सोनियांचे निर्देश, रोज भेटावे लागेल
सोनिया गांधी यांनी संसदीय दलांना निर्देश दिले आहे की मानसून सेशनदरम्यान सर्वांना दररोज भेटावे लागेल. कोणताही संसदीय मुद्दा अससेल तर सेशनच्या मध्येही भेट घ्यावी लागेल. या दलांची जॉइंट मीटिंगही होईल आणि याची जबाबदारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

राफेल आणि व्हॅक्सीनेशनवर सरकारला घेरणार काँग्रेस
पावसाळी अधिवेशनादरम्यान देशात मंद गतीने सुरू असलेले लसीकरण, दुसरी कोरोना लाट, आरोग्य सुविधा आणि राफेल डीलच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार आहे. राफेलचा मुद्दा 2019 मध्ये मोदींच्या दुसऱ्या विजयानंतर शांत झाला आहे. खरेतर फ्रान्सच्या न्यायालयाने जेव्हा या डीलचे आदेश दिले, त्यानंततर राहुल आणि दुसरे नेते सलग हे मुद्दे उचलून धरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...