आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संसदेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. त्या म्हणाल्या की, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या वर्षात आजपर्यंत काहीही बदललेले नाही. स्वाती पुढे म्हणाल्या की, महिला सुरक्षेवर आज संसदेत चर्चा झाली पाहिजे.
16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत 6 आरोपींनी निर्भयावर बलात्कार केला होता. यामध्ये एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली होती. तर दुसरा अल्पवयीन होता. त्यामुळे तीन वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली होती. उर्वरित चार आरोपींना 20 मार्च रोजी फाशी देण्यात आली होती.
मनीष तिवारी यांनी तवांग प्रकरणी चर्चेची मागणी केली
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. मनीष म्हणाले की, भारत-चीन सीमेची स्थिती जाणून घेण्याचा अधिकार देशातील जनतेला आहे. संरक्षणमंत्र्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केलेली नाही.
राजनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, 9 डिसेंबर 2022 रोजी चिनी सैनिकांनी तवांगमध्ये LAC चे आणि नियमांचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने पीएलएला अतिक्रमण करण्यापासून रोखले. या घटनेत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाले आहेत. आमचा एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. चिनी सैनिक माघारी गेले.
ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत सरकार आणि विरोधक एकत्र
गुरुवारी राज्यसभेत ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा झाली. या प्रकरणी सरकार आणि विरोधकांमध्ये एकजूट दिसून आले. ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी एकमत केले की, याला तोंड देण्याची जबाबदारी एकट्या सरकारवर टाकता येणार नाही. समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
DMK खासदार तिरुची सिवा यांनी सांगितले की, 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे एक उंच ध्येय आहे. सरकारने 2070 ऐवजी 2040 चा विचार करावा.
विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंचा मुद्दा
मंगळवारी बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेतही गाजला. भाजप खासदारांनी नितीश सरकारला घेरले आणि बिहार सरकार सामूहिक हत्या करत असल्याचे म्हटले. भाजप खासदार संजय जयस्वाल म्हणाले की, नितीश म्हणत आहेत की जो पिणार तो मरणार, पण मग ते दारू विकणाऱ्यांना तिकीट देतात. या मृत्यूंना नितीश सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. एकीकडे लोक मरत आहेत, तर दुसरीकडे विधानसभेत नितीश कुमार आपला संयम गमावत आहेत.
एमबीबीएसच्या जागा वाढल्या - मांडविया
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, 2014 पासून शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. कोरोनाच्या काळात शिक्षण थांबू नये म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले. शाळांमध्ये 4.5 लाखांहून अधिक शौचालये बांधल्यामुळे मुलींच्या गळतीचे प्रमाण 70% वरून 13% झाली आहे.
2014 मध्ये MBBS च्या जागा 53,000 होत्या. त्या आता 96,000 झाल्या आहेत आणि PG च्या जागा 31,000 होत्या आता 63,000 झाल्या आहेत. मेडिकल कॉलेजेसच्या जागाही दुप्पट झाल्या आहेत. देशात शिक्षणाची ताकद वाढत आहे. सर्व लोकांना शिक्षणात संधी मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
केंद्र सरकार 16 विधेयके सादर करणार
संसदेचे हे अधिवेशन 17 दिवस चालणार आहे. यादरम्यान सरकार 16 विधेयके संसदेत मांडण्यात येत आहे. पहिल्या दिवशी राज्यसभेत वन्यजीव संरक्षण (सुधारणा) विधेयक 2022 वर चर्चा झाली. तर लोकसभेत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी झाली. राज्यसभेच्या 258 व्या अधिवेशनाचा पहिला दिवस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठीही खास होता. कारण राज्यसभा अध्यक्ष म्हणून त्यांचा पहिला दिवस होता.
तवांग चकमकीवर संरक्षणमंत्र्यांचे 3 मिनिटांचे निवेदन
अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ म्हणाले- 9 डिसेंबर 2022 रोजी PLAच्या जवानांनी तवांगमध्ये एलएसीचे उल्लंघन करून नियम तोडले. भारतीय लष्कराने पीएलएला अतिक्रमण करण्यापासून रोखले. त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले.
या घटनेत दोन्ही बाजूचे काही सैनिकही जखमी झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. आपला एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. सैन्याने वेळीच हस्तक्षेप केला. यामुळे चिनी सैनिक माघारी गेले. यानंतर, स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर रोजी चीनच्या काउंटर पार्टसोबत व्यवस्थेनुसार ध्वज बैठक घेतली. चीनला अशा कारवाईस मनाई करण्यात आली आणि शांतता राखण्यास सांगितले आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले- सध्या रेल्वेची स्थिती चांगली नाही
भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटा मधील देण्यात येणारी सवलत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे देशभरातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसला. ही सवलत सुरू होण्याची वाट ज्येष्ठ नागरिक पाहत आहेत. मात्र, त्याच्या आशेवर पुन्हा पाणी फिरले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासादरम्यान देण्यात आलेल्या सवलती पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महुआ मोइत्रांवर सीतारामन यांचा पलटवार
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा विरुद्ध अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे चित्र दिसून येत आहे. तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अतिरिक्त अनुदानाच्या मागणीवर सरकार खोटे दावे करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर निर्मला सीसंसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांचा गदारोळतारामन यांनी सर्व प्रश्नांची उत्तर देत हल्लाबोल केला. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
TMC खासदार महुआ मोइत्रा संसदेत आक्रमक:म्हणाल्या
तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अतिरिक्त अनुदानाच्या मागणीवर सरकार खोटे दावे करत असल्याचा आरोप केला. सीतारामन यांनी 12 डिसेंबर रोजी लोकसभेत सांगितले होते की, 2022-23 साठी आम्हाला 3.26 लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची आवश्यकता आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.