आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Parlors Open And Shopping Starts Somewhere; People Said Everything Will Be Fine Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुळावर येत आहे सामान्यांचे आयुष्य:कुठे पार्लर सुरू, तर कुठे शॉपिंग; परिस्थिती लवकरच ठीक होईल- नागरिकांना बोलून दाखवला विश्वास

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो अहमदाबादचा आहे. येथील काही भागांमध्ये सलून आणि ब्यूटी पार्लर उघडण्यास मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी प्रोटेक्टिव किट घालूनच काम करण्यात आले - Divya Marathi
फोटो अहमदाबादचा आहे. येथील काही भागांमध्ये सलून आणि ब्यूटी पार्लर उघडण्यास मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी प्रोटेक्टिव किट घालूनच काम करण्यात आले

लॉकडाउन फेज-4 मध्ये देशातील अनेक भागांमध्ये सवलती दिल्यानंतर नागरिकांचे आयुष्य हळु-हळू रुळावर येताना दिसत आहे. अहमदाबादमध्ये सलून आणि पार्लरवर अपॉइंटमेंट घेऊन लोक गेले, तर दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कपड्यांची शॉपींग करताना नागरिक दिसले. याशिवाय अनेकजण ऑफिसलाही जात आहेत. 

मध्य प्रदेश

भोपाळ, इंदुर, जबलपूर आणि ग्वालियरच्या काही भागांमध्ये दुकाने उघडत आहेत. एका अंदाजानुसार पाच हजार कर्मचारी भोपाळवरुन आणि  3 हजार कर्मचारी मंडीदीपमध्ये बनलेल्यॉ कॉलोन्यांमधून आपल्या ऑफिसला जात आहेत. तसेच, राज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याची प्रक्रीयादेखील सुरूच आहे.

हा फोटो भोपाळच्या हबीबगंज स्टेशनचा आहे. येथून श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. 

हा फोटो इंदुरच्या छोटा बांगड़दाचा आहे. सवलत मिळाल्यानंतर काहीजण क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

महाराष्ट्र

लॉकडाउन उघडल्यानंतर अनेकजण आपल्या कामावर परतले. अनेक ठिकाणी दुकाने उघडलेली दिसली. अॅप बेस्ड कॅब सर्विस सुरू झाल्या आहेत. मुंबईमध्ये मंगळवारी सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, औरंगाबादमध्ये अत्यावश्यक सेवेंची दुकाने 21 मेनंतर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हा फोटो पुण्यातील आहे. ससूनमधील नर्स आपल्या घरी पोहचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुंबईमधून प्रवासी मजुरांचे पलायन सुरुच आहे. सीएसटी स्टेशन बाहेर श्रमिक ट्रेन्ससाठी मजूर एकत्र येत आहेत.

दिल्ली

राजधानीत बुधवारी सार्वजनिक परिवहन जसे बस, ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी चालवण्यात आल्या. ऑड-ईवन फॉर्मूलेनुसार मार्केटदेखील सुरू होत आहेत. कनॉट प्लेस, तिलक नगर, करोल बाग, सरोजनी नगरचे व्यापारी दुकानांची साफ सफाई करताना दिसले.

दिल्लीमध्ये गारमेंट्सची दुकाने उघडली.

लॉकडाउनमध्ये सवलती मिळाल्यानंतर  दिल्ली के खान मार्केटमधील दुकाने सुरू करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...