आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने, अशा दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीबीआयच्या येण्यामुळे राज्यांच्या अधिकारांवर केंद्राचे अतिक्रमण या मुद्द्यावर राज्य सरकारची याचिका आहे. तर, दुसरीकडे अनिल देशमुख हेदेखील न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीसाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे, त्यामुळे ही सुनावणी तातडीने गरजेची असून, लवकर यावर सुनावणी व्हावी, असे या याचिकेत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.