आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. महिनाभरासाठी तो तुरुंगाबाहेर आला आहे. यापूर्वी त्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 21 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. आश्रमात दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी तो सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तो बाहेर पडला आणि थेट बागपतच्या आश्रमात गेला.
बर्नवा आश्रम नवीन स्थान
बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमने एक महिन्याच्या पॅरोलसाठी अर्ज केला होता. पॅरोलच्या काळात त्याचे निवासस्थान बागपत येथील बर्नवा आश्रम असेल. सरकारच्या वतीने यासंदर्भात बागपत प्रशासनाकडून अहवालही मागवण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाकडून कोणताही आक्षेप न मिळाल्याने त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला.
फेब्रुवारीत 21 दिवसांचा पॅरोल
या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये राम रहीमला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. गुरमीत राम रहीम 7 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर आला आणि त्याचा पॅरोल कालावधी 28 फेब्रुवारीला संपला होता. त्यानंतर त्याला सुनारिया कारागृहात आणण्यात आले होते. त्याआधी गेल्या वर्षी त्याला आजारी आईला भेटण्यासाठी एक दिवसाचा इमर्जन्सी पॅरोल मिळाला होता. फेब्रुवारीमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत सरकारने त्याला झेड प्लस सुरक्षा दिली होती.
जन्मठेपेची शिक्षा
राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याच्या सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. याशिवाय डेरा माजी मॅनेजर रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणीही राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.