आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - नितीन गडकरी:गडकरींसाठी पक्षघटना बदलण्यात आली, सासऱ्याच्या घरावर चालवला बुलडोझर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : 27 मे 1957, नागपूर शिक्षण : नागपूर विद्यापीठातून एमकॉम, एलएलबी कुटुंब : पत्नी कांचन गडकरी, दोन मुले निखिल आणि सारंग, मुलगी केतकी मालमत्ता : सुमारे ~25 कोटी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रानुसार

‘मी महत्त्वाकांक्षांवर नव्हे, तत्त्वांवर राजकारण करतो’, असे प्रतिपादन भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्र सरकारमधील परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावर्षी मार्च महिन्यात पुण्यात आयोजित पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना केले होते. सध्या भाजपने त्यांना धोरण ठरवणाऱ्या पक्षाच्या सर्वोच्च मंडळाच्या संसदीय मंडळातून काढून टाकले आहे. संघाचे आवडते मानले जाणारे गडकरी यांना 2009 मध्ये पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. तेव्हा ते फक्त 52 वर्षांचे होते. 2012 मध्ये त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना ते म्हणाले होते की, नेत्यांनी बुडत्या जहाजातून उडी मारल्यासारखे पक्ष बदलणे टाळावे. राजकीय तत्त्वांबरोबरच गडकरी कामाबद्दलही प्रामाणिकपणा दाखवतात. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असल्याने सासऱ्याच्या घरावर पत्नीला न सांगता बुलडोझर चालवला होता. गडकरी हे एक यशस्वी उद्योगपती व शेतकरीही आहेत.

19 व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय
नितीन गडकरी यांनी वयाच्या 19 व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व घेऊन राजकारणाला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1985 मध्ये ते नागपुरात भाजपचे प्रदेश सचिव झाले. 1989 ते 2008 पर्यंत ते नागपूरचे आमदार होते. या दरम्यान ते 1995ते 1999 या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 2004 मध्ये भाजपने महाराष्ट्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. डिसेंबर 2009 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 2014 मध्ये केंद्रात रस्ते वाहतूक व महामार्ग, शिपिंग मंत्रालय सांभाळले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून खासदार झाले. सध्या रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री आहेत.

नितीन गडकरी यांनी वयाच्या 19 व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व घेऊन राजकारणाला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1985 मध्ये ते नागपुरात भाजपचे प्रदेश सचिव झाले. 1989 ते 2008 पर्यंत ते नागपूरचे आमदार होते. या दरम्यान ते 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 2004 मध्ये भाजपने महाराष्ट्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. डिसेंबर 2009 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 2014 मध्ये केंद्रात रस्ते वाहतूक व महामार्ग, शिपिंग मंत्रालय सांभाळले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून खासदार झाले. सध्या रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री आहेत.

{लोकशाहीसाठी मजबूत काँग्रेस आवश्यक आहे. हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर मजबूत व्हावा, अशी इच्छा असल्याचे ते पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते. {2019 मध्ये म्हणाले की, मी कोणत्याही कामात सरकारची मदत घेत नाही. कारण सरकार हात लावते तिथे सत्यानाश होतो. {2021मध्ये ते म्हणाले की, वाहनांच्या हॉर्नमध्ये भारतीय संगीत वाजवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी कायदा करण्यात येणार आहे.

प्रारंभिक जीवन :
वडील संघ स्वयंसेवक, ​​​
गडकरींचे वडील जयराम रामचंद्र गडकरी हे शेतकरी होते. आई भानुताई गृहिणी होत्या. त्यांचे घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ होते. वडील संघ स्वयंसेवक होते. आई भानुताई संघ प्रचारक होत्या. नितीन हेही बालपणापासून संघाशी जोडले गेलेे. कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन फारच कमी होती. त्यांचे बालपण खूप संघर्षात गेले. शिकत असताना ते मित्रासोबत फर्निचरचे दुकान चालवत असत. हळूहळू त्यांनी व्यवसाय विस्तार केला. सध्या त्यांच्याकडे साखर कारखाना, इथेनॉल ब्लेंडिंग प्लँट, पॉवर व सोयाबीन प्लँट आहे. सामाजिक कार्यकर्त्या कांचन यांच्याशी त्यांचा 1984 मध्ये विवाह झाला.

गाडीत सापडला मुलीचा मृतदेह
{नोव्हेंबर 2011 मध्ये गडकरींच्या गाडीत योगिता ठाकरे या सफाई कामगाराच्या मुलीचा मृतदेह सापडला होता, त्यावर पोलिस व पोस्टमार्टम रिपोर्टचे तथ्य परस्परविरोधी होते.
{2014मध्ये पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कौटुंबिक कंपनीला फायदा केल्याचा आरोप.
{गडकरींच्या पूर्ती समूहात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने 2012 मध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेकांचे पत्ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले.

बातम्या आणखी आहेत...